पान:मेणबत्त्या.pdf/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आसीड मिळवावें, असें पान १७० वर लिहिले आहे. पण त्या वेळेस सोडा पामिटेटमध्ये सलफ्युरीक आसीड न मिळवितां चुन्याचें* पाणी मिळवावें. चुन्याचे पाणी ( milk of lime.) बनविण्याचे प्रमाणकळीचुना भाग १ + गोडे पाणी भाग २ एकत्र करावे. व सर्व मिश्रण एक जीव होईपर्यंत ढवळावे. नंतर चुन्याचे पाणी व सोडा पामिटेट यांचे मिश्रण एका बंद भांड्यांत घालून हवेच्या ३ दावाखाली रकळावे. म्हणजे पामिटीक आसीड व चुना यांचा अविद्राव्य साबू व तीव्र सोडा द्रव तयार होतात. या तीव्र द्रवांत चुन्याचा पामिटेट म्हणजे चुन्याचा साबू तरंगत असतो. ही रसायनिक प्रतिक्रिया होण्यास चुन्याचे पाणी इतके जास्त मिळवावे लागते की, शेवटी तयार होणारा तीव्र सोडा द्रव फक्त बाम. हाय. ६ अंशप्रमाणाचा असतो. इतक्या हलक्या तीव्र सोडा द्रवापासून ४३° अंशप्रमाणाचा तीव्र सोडा द्रव पुनः याच कामी वापरण्यास तयार करण्याचे काम फार खीचें व फार त्रासाचें असते. सबब वर लिहिलेल्या १ ल्या रीतीनेच ( लेब्लांक प्रोसेसने) सोडा सलफेटचा तीव्र सोडा केला असतां खर्च व त्रास कमी पडून का- . म लवकर व सोईवार होऊ शकते. आतां वरील कोणत्याही रीतीने बनविलेला तीव्र सौड़ा द्रव आटवून तो बा. हा. ४३ अंशप्रमाणाचा तयार करून पुढील उपयोगाकरितां एका लोखंडी हौदांत ठेवावा लागतो. तेथे तो थंड होतो. या द्रवायर बन्याच रसायनिक क्रिया घडल्यामुळे त्यांत सोडा सलफेट, सोडा कार्बोनेट, व सोडा आसिटेट इतके पदार्थ कणरूपाने तयार होतात. त्यापैकी सोडासलफेट व सोडा कार्बोनेट या दोन पदार्थांचे कण त्या

  • सुमारे ७५ शेर कळीचुना १४० शेर गोड्या पाण्यांत मिळवून वरील सोडा पामिटेटमध्ये मिळावा म्हणजे पामिटीक आसीड सुटें होतें.