पान:मेणबत्त्या.pdf/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७१ पातनाने बाहेर काढतात, ह्मणजे ते फार पांढरे व स्वच्छ होते. हे सर्व पामिटीक आसीड उर्ध्वपातनाने त्या भांड्याच्या बाहेर निघाल्यावर त्या भांड्याच्या तळीं डामरासारखा पदार्थ रहातो. या डामराचे प्रमाण मूळ स्निग्ध पदार्थाच्या दर १०० भागास हा डामर ३ भाग तयार होतो. तो डामर त्यांतून काढून इतर उपयोगांत घेण्यास्तव कोठारांत साठवून ठेवावा. या पामिटीक आसिडाची केलेली मेणबत्ती जळतांना प्रकाश स्वच्छ पडतो व तिच्या ज्वालेतून धूर निघत नाही. हे दिसण्यांत व कठीणपणांत उत्तम व स्टिअरीक आसिडासारखे असते. याच्या व स्टिअरीक आसिडाच्या मिश्रणाने केलेल्या मेणबत्या अर्धपारदर्शक असतात, हा गुण मेणबत्त्या बनविणारांच्या दृष्टीने अति उत्तम ठरला आहे. आता या रीतीने घट्ट स्निग्ध आसीड तयार केलें ह्मणजे तीव्र सोडा या पदार्थाचा सोडा सलफेट बनून त्याचा द्रव तयार होतो, व्यापारी दृष्टीने या द्रवांत सोडा आहे तो फुकट जाऊं देणे योग्य नाही, सबब या सोडा सलफेटच्या द्रवापासून पुनः तीव्र सोडा द्रव तयार करावा. आणि याच रीतीने दुसऱ्या पातळ स्निग्ध पदार्थाचे घट्ट स्निग्ध आसीड बनविण्याच्या कामी त्याचा ( तीव्र सोडा द्रवाचा ) पुनः उपयोग करावा ह्मणजे खर्च बराच कमी लागतो. सोडा सलफेटचा तीव्र सोडा दोन रीतींनी बनवितां येतो. १ ली रीत-प्रथम सोडा सलफेटचा सोडा कार्बोनेट लेब्लांकच्या रीतीने बनवावा, नंतर त्या सोडा कार्बोनेटचा तीव्र सोडा चुन्याच्या क्रियेने बनवावा याबद्दल आमच्या साबू पुस्तकांत ६५ पानावर ब्ल्याक एश प्रोसेस (रीत ) लिहिली आहे ती पहा. २री रीत--या ६ व्या रीतीने सोडा पामिटेट तयार झाल्यावर त्यापासून पामिटीक आसीड निराळे करण्यास्तव त्यांत सलफ्यरीक