पान:मेणबत्त्या.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४



चै कसरींत उत्तम अभिप्राय दिला आहे. हे गृहस्थ देवास मुक्कामी साबूचा मोठा कारखाना लवकरच काढणार आहेत. त्या कार. खान्यास जोडुन एक लहानशी प्रयोगशाळा काढावी असी माझी इच्छा मी त्यांस दर्शविली होती. त्याप्रमाणे श्री. सरकार मल्हारराक बाबासाहेब महाराज राजेसाहेब देवास (छोटीपाती) व रा. ब. दौलतरावजी खानविलकर दिवाण साहेब देवास यांजकडे जाऊन रा. ब्यास यांनी ही हकीगत निवेदन केली. नंतर याबद्दल बराच विचार होऊन श्री. राजेसाहेब व त्यांचे मंत्री साहेब या उभयतांसही 'देवास' मुक्कामी औद्योगिक शिक्षण देण्याची सोय करणे हे काम अवश्य वाटले. यावरून लवकरच तेथे कारखाना निघून साबू शिकण्याचा क्लासही निघेल असे वाटते. आतां वरील गोष्ट परस्वाधीन असल्याने थोडी शंका उत्पन्न होते. यास्तव उत्सुक मंडळीच्या सोईकरितां यावद्दल माझे विचार खाली दर्शविले आहेत:---
 कारखाना चालविण्या योग्य साबूचे काम शिकण्यास सुमारे ७-८ महिने लागतात. सबब असा वर्ग काढण्यास अगोदर कढया, भांडी, सांचे, प्रेस, मिलींग मशीन, व मोल्डींग मशिने तयार केली पाहिजेत. तसेंच निरनिराळी तेले, खार, रंग, व सुगंधी वगैरे पदार्थ विकत घेतले पाहिजेत. या कामी सुमारे तीन हजार रुपयांची अवश्यकता आहे. एवढी रक्कम रोकड असल्या शिवाय असा वर्ग सुरू करता येत नाही, ह्मणन दरएक विद्यार्थ्याने पूर्ण सत्राची फी सुमारे ७५ रुपये दिली पाहिजे; व असे विद्यार्थी निदान ५० तरी मिळाले पाहिजेत. म्हणज सुमारे पावणेच्यार हजार रुपये रोकड हातांत आल्याशिवाय असा वर्ग मजसारख्या गरीब मनुष्यास सुरू करता येणे शक्य नाही. प्रामाणीकपणाबद्दल खात्री करून देण्यास मी तयार आहे. वनस्पतीज तेलापासून