पान:मेणबत्त्या.pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७० पहिल्या थरातील प्याराफीन मूळ टाकलेल्या वज़ना ( २०० शेर ) पैक्षा सुमारे १७ शेर कमी भरते. आतां त्या निराळ्या काढलेल्या सोडिअम पामिटेटमध्ये सलफ्युरीक आसीड व गोडे पाणी समभाग मिळवून ते सर्व मिश्रण गरमीवर थोडेसें उकळून स्थिर ठेवावे. ह्मणजे त्या मिश्रणांत सोडासलफेट रसायन रीतीनें बनून त्याचा द्रव तळी जमतो व पामिटीक आसीड सोड्यापासून निराळे होऊन वरती तरंगते. सोडीअमपामिटेटचा साबू पूर्णपणे द्रवीभूत होईल इतकें सलफ्युरीक आसीड त्यांत मिळवावे लागते. सुमारे २१० शेर बाजारी सलफ्युरीक आसीड मिळविले असतां पुरे होईल. तें मिश्रण वारंवार ढवळून पाहून त्यांत सोडापामिटेट दिसत नाही असे झालें ह्मणजे सलफ्यूरीक आसीड पुरेसें त्यांत मिळविले गेलें असें समजावें. सलफ्युरीक आसिडा बरोबर, सोडापामिटेट मधील सोड्याचा रसायन संयोग होऊन सोडासलफेट तयार होतो व तो पाण्यांत मिश्र होऊन तळाशी त्याचा द्रव जमतो; व सुटे झालेले पामिटीक आसीड त्या द्रवाच्या वरच्या भागी जमते ही मुख्य व मुद्याची रसायनक्रिया आहे. सबब ती बरोबर पूर्ण करणे हेच या क्रियेचे मुख्य तत्व आहे. नंतर वरचे पामिटीक आसीड काढून एका दुसया लोखंडी हौदांत टाकावे. व त्यांत गरम पाणी त्याच्या दुप्पट मिळवून खूप जोराने त सर्व ढवळावें. ह्मणजे त्यांत अडकून राहिलेला सोडासलफेट पाण्यांत मिळतो आणि त्यायोगें पामिटीक आसीड स्वच्छ होते, नंतर तें मिश्रण स्थिर ठेवावें झणजे पामिटीक आसीड वरती जमते. ते काढून घेऊन उर्ध्वपातनाच्या भांड्यांत घालावे. या वेळेस या पामिटीक आसिडाचा रंग पांढरवट पिवळसर (चाकोलेट रंगसारखा ) असतो. व त्याचें घनीभवनाचे उष्णमान १२२-१२७° फा अंशाचे असते. नेहमीच्या उर्व पातनाच्या भांड्यांत हे पामिटीक आसीड घालून उर्व