पान:मेणबत्त्या.pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ध्या भागी त्या द्रवावर तरंगत असते. ते वरचे पामिटीक आसीड ह. ळूच काढून घेऊन मागे ३९ पानावर लिहिल्याप्रमाणे त्याच्या घनीभवनाचे (घट्ट होण्याचे ) उष्णमान काढावे. पामिटीक आसिडाचे घनीभवनाचे उष्णमान १२२-१२७° फा. अंश असते. याप्रमाणे पामिटीक आसीड मूळपदार्थापासून तयार झाले म्हणजे उष्णता बंद करावी. काडतूस प्रथम भरण्यास सुरवात केल्यापासून ते रिकामें करीपर्यंत व मध्यंतरी त्यांतील मिश्रण शिजेपर्यंत सुमारे ३०-४० तास वेळ लागतो. याप्रमाणे काडतुसांतील मिश्रणास १९०° फा. अंशाची उठणता देऊन नंतर परीक्षेने पामिटीक आसीड तयार झाले अशी खातरी झाल्यावर खालची उष्णता बंद करून ते मिश्रण सुमारे २५०° फा. अंशापर्यंत थंड होऊ द्यावें. नाही तर अतिउष्ण मिश्रण बाहेर काढतांना भांडे फुटून इजा होण्याचा संभव असतो. नंतर काडतुसाच्या खालच्या ख नळाचा काक उघडून त्याखाली ठेवलेल्या लोखंडी हौदांत सोडिअम पामिटेट काढावा. सोडिअम पामिटेट हा एक प्रकारचा साबूच आहे. सबब तो घशा स्थितीत खाली पडतो. त्यास पातळ होण्यापुरतें त्यांत पाणी मिळवून वाफेच्या गरमीनें तो पातळ करावा. नंतर ते पातळ मिश्रण स्थिर ठेवावे. ह्मणजे त्या मिश्रणांत तीन थर तयार होतात. वरचा थर प्याराफीनचा असतो. मधला थर सम झालेला जो सोडिअम पामिटेट त्याचा असतो. व खालचा थर तीव्र सोडा द्रवाचा असतो. हा तीन सोडाद्रव बहुत करून सुमारे १८ बा. हा. अंश प्रमाणाचा असतो. नंतर पहिल्या मणजे वरच्या थरांतील प्याराफीन मेण सायफोन किंवा शोषक नळीनें निराळे काढून दुसरीकडे ठेवावे. नंतर मधला थर जो सोडिअमपामिटैट तो दुसऱ्या लोखंडी हौदांत काढावा. नंतर तिसरा थर जो तीव सोडाद्रव तो एका तिस-या हौदांत काढावा.