पान:मेणबत्त्या.pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कुजका वास येण्यास सुरवात होते. त्या वायूस कुजवा वास येऊ लागला म्हणजे त्या मिश्रणास दाहक उर्ध्वपातनाची स्थिती प्राप्त झाली आहे, असे समजावें. दाहक उर्ध्वपातन म्हणजे ज्या पदार्थाचे पृथकरण केले असेल त्यांतील काही घटक जाळून टाकून बाकीचे घटक जेथें हस्तगत करावयाचे असतात तेथें असें में उर्ध्व पातन करतात, त्यास दाहक उर्ध्वपातन ह्मणतात. पण आपणास तर फक्त पातळ स्निग्ध पदार्थाचे प्रथक्करण करून त्याच्या घटकांत फेर बदल कराव. याचा आहे. सबब दाहक उर्ध्वपातन करण्याची जरूर नाही. म्हणून त्या मिश्रणास ६९०° फा. अंशापेक्षा जास्त उष्णता देऊं नये. तरी पण त्या मिश्रणास काही वेळ ५९०° फा. अंशाची उष्णता दिला असता त्याचे उष्णमान ६९०° फा. अंशापेक्षा थोडेसे तरी जास्त हातेंच, व जास्त उष्णमान झाले की त्यांतून निघणान्या वायूस कुजका वास येऊ लागतो. अशी स्थिति न होऊ देण्याकरितां त्या मिश्रणात ५९०° फा. अंशाची उष्णता पोचून थोडा वेळ झाल्याबरोबर त्यात गया पिचकारीतून ( ही पिचकारी ग नळीतून काडतुसांत सोडावी ) एकदम वाफ सोडावी. म्हणजे त्या मिश्रणाची उष्णता एक सारखी व कमी होते. नंतर खालची उष्णता लगेच बंद करावी. शिजण्याचे काम चालू असतांना मधून मधून त्यांतील थोडा नमुना बाहेर काढून तपासावा. । तपासण्याची रीत--या मिश्रणांत सोडीअम पामिटेट तयार झा• लेला असतो. तो पूर्ण झाला आहे की नाही याची परीक्षा करणे आहे. सबब त्या काडतुसांतील मिश्रण सुमारे १ तोळा काढून काचेच्या परिक्षक नळीत टाकावे. त्यात थोडेसे डायल्यूट सलफ्युरीक - आसीड मिळवून मद्यार्काच्या दिव्यावर गरम करावे, म्हणजे सोडा सलफेट व पाणी त्या नळीच्या खालच्या भागी जमतें व पामिटीक आसीड तिच्या वर