पान:मेणबत्त्या.pdf/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्याराफीन मिळवितात. म्हणजे ते मिश्रण शिजतांना त्याची उष्णता एक सारखी रहाते व प्याराफीन फारसें फुकट जात नाही. तीव्र सोडा द्रव ४१० बाय हायडा. अंशाचा तयार करून एका लोखंडी हौदांत सांठवून ठेवावा. १६१० शेर ओलिईक आसीड किंवा वनस्पतिज पातळ तेल इ भोंकावाटे काडतूसामध्ये टाकावें; नंतर तीव्र सोडा द्रव ( ४१° बा. हा, अंशाचा ) २७५० शेर याच इ भोंकांतून काडतूसामध्ये सोडावा. नंतर त्या मिश्रणांत सुमारे २०० शेर कठिण प्याराफीन मेण इ भोंकावाटे टाकावे. नंतर ड चाकाने क दांडा फिरवून ते मिश्रण ढवळावे; व उष्णता हळूहळू देण्यास सुरवात करावी. हे मिश्रण उकळू लागले म्हणजे त्यांतून वाफ निघण्यास सुरवात होते. ती वाफ इ या मोठ्या द्वारांतून बाहेर जाऊं द्यावी. या मिश्रणास जास्त उष्णता पोंचली म्हणजे त्यांतून वाफ निघण्याचे बंद होते. वाफ निघणे बंद झात्यावर इ हे मोठे द्वार बंद करावें. नंतर ज नळीचा काक उघडून ठेवावा. म्हणजे त्या मिश्रणांतील सुटा झालेला ग्यास (वायुरूप पदार्थ) बाहेर जाण्यास मार्ग होतो. तो वायुरूप पदार्थ ज द्वाराबाहेर निघाला म्हणजे कोळशाच्या केलेल्या चिमणीतून ग्यास धरण्याच्या पात्रांत सोडतात. काडतूसामधील मिश्रणास ५५४° फा. अंशांची उष्णता पोचली म्हणजे त्यांतील ओलिईक आसिडाचे पृथक्करण होण्यास सुरवात होते; व त्यांतील हायड्रोजन नामक वायु पुष्कळसा बाहेर पडतो. काडतुसांतील मिश्रणास ५७२-१९०° फा. अंशांची उष्णता पोंचली म्हणजे त्यांतील पातळ स्निग्ध पदार्थाचे पृथकरण पूर्ण होऊन त्याचे रसायन रीतीने घट्ट स्निग्ध आसीड तयार होते. जर हे मिश्रण शिजतांना त्यास ६००-६०८° फा. अंशाची उष्णता चुकीने पोंचली तर ज नळीवाटे निघणान्या वायूचा वास त्वरित बदलतो. व त्यास