पान:मेणबत्त्या.pdf/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

फ--या सेफटी व्हालव्ह जवळचं उष्णतामापक यंत्र लावण्याची जागा करितात. या कामी उष्णतामापक यंत्राची आवश्यकता असते. याप्रमाणे ओलिईक आसीड किंवा पातळ वनस्पतिज तेले शिजविण्याचे भांडे जे काडतूस त्याची रचना व माहिती आहे. २ या शिवाय तीव्र आलकलीचा द्रव ठेवण्यास मोठाले लोखंडी हौद दोन चार लागतात. या प्रत्येकाच्या तळी व मध्ये नळ्या व काक लागू केलेले असतात. . ३ तयार होणाऱ्या पामिटीक आसिडाचे उर्ध्वपातन करण्यास एक त्या मानाचे उर्ध्वपातन यंत्र लागते. ४ या शिवाय लागणारे इतर पदार्थ व तयार होणारे इतर पदार्थ ठेवण्यास, काढण्यास, धुण्यास व काढघाल करण्यास कढया, भांडी, नळ्या, हौद वगैरे सामान व कच्चा माल तीव्र आलकली, प्याराफीन इतकी सामग्री तयार ठेवावी लागते. या रीतीने काम करण्याची माहिती-प्रथम या कामी तीव्र पोख्याश द्रव वापरीत असत. परंतु पोट्याश ही आलकली किमतीने सोड्यापेक्षां महाग आहे म्हणून हल्ली तीव्र सोडा आलकलीच वापरतात. या कामी सोडा आलकली वापरली तर मध्यंतरी तयार होणारा साबू (सोडा ओलियेट) व पोट्याश आलकली वापरली तर तयार होणारा साबू ( पोट्याश ओलियेट) असे निराळ्या जातींचे साबू बनतात. पोव्याश ओलियेटपेक्षां सोडा ओलियेट साबूच्या आंगीं शिजतांना त्याच्या सर्व भागांत एक सारखी उष्णता राखण्याचा गुण कमी आहे. व या रीतीने काम करण्यास सर्वत्र सारखी उष्णता ठेवण्याची फार आवश्यकता असते. म्हणून तीव सोडा आलकली वापरून या रीतीने घट्ट स्निग्ध आसीड बनविणे असेल तेव्हां प्रथमच त्या मिश्रणांत कठिण