पान:मेणबत्त्या.pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

झणजे क दांडा फिरतो, आणि क दांडा फिरला झणजे काडतुसांतील मिश्रण ढवळले जाते. मिश्रण ढवळण्यास्तव यास आडवे हात लावावे. -ड--हें चाक क दांड्याच्या वरच्या व बाहेरच्या भागी तो फिरता ठेवण्यास लागू केले आहे. इ--हे काडतुसाचे मोठे द्वार आहे. काडतुस तयार करतांनाच या ठिकाणी त्यासं मोठे भोंक पाडून त्या भोंकावर स्क्रूचे वेढे असलेले झांकण लागू करितात. यास काडतुसाचे मुख्य द्वार ह्मणतात. याच द्वारांतून पातळ स्निग्ध पदार्थ व तीव्र आलकली द्रव वगैरे काडतुसांत टाकतात. फ--हा संरक्षक पडदा ( सेफटी व्हालव्ह ) आहे. काडतुसांतील मिश्रण शिजतांना त्यावर जास्त दाब पडला तर तो दाब कमी करण्याच्या कामी या पडद्याचा उपयोग करितात. गह--या दोन नळ्या काकसहित काडतुसाच्या उजव्या व वरच्या बाजूस लागू केल्या आहेत. यांतून पाणी किंवा वाफ ही काडतुसांत सोडतां येतात. ज--ही लोखंडी वांकडी नळी काकसह काडतुसाच्या डाव्या बाजूवर लागू केलेली आहे, हिच्यांतून वाफ व हायड्रोजन बाहेर सोडतात. ख--ही लोखंडी मोठी नळी काकसहीत काडतुसाच्या तळाशी उजव्या बाजूस बसविलेली असते. या नळीतूनच काडतुसांत शिजलेलें द्रव्य त्याच्या बाहेर काढतात. ।-~ही गिफरडची पिचकारी ( गिफरड इनजेक्टर) आहे. ही आयत्या वेळेस ग या नळांत लागू करून तिच्या वाटे काडतुसांतील मिश्रणांत वाफ सोडतात. ..ल--ही भट्ठी आहे. हिच्यात कोळसे जाळून उष्णता उत्पन्न करतात.