पान:मेणबत्त्या.pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आतां या ओलिईक आसिडाचा साबू करावा किंवा मेणबत्त्याचें घट्ट द्रव्य पुनः बनवा हा प्रश्न दोन्ही पदार्थांच्या तत्रस्थ किमती व दोन्ही रीतीस येणारा खर्च या दोहोंच्या तुलनेवर अवलंबून आहे. सबब तपास करून फायद्याची जी रीत ठरेल तिचंच अवलंबन करावे, अशी सूचना करून ठेवतो. सन १८४१ साली मि. वारनट्राप या गृहस्थाने असे सिद्ध केलें की, तीव्र पोट्याशचे जास्त प्रमाण घेऊन त्याबरोबर ओलिईक आसीड मिळवून या मिश्रणास जास्त गरमी लाविली तर त्या ओलिईक आसिडाचे पृथक्करण होते, ह्मणजे त्या मिश्रणांत पामिटिक आसीड, आसेटीक आसीड व हायड्रोजन इतके पदार्थ तयार होतात. ही आसिडें पोव्याशबरोबर संयोग पावतात व हायड्रोजन सुटा पडतो. खाली दिले. ल्या समीकरणाने याचे स्पष्टीकरण केले आहे. ओलिईकआसीड+पोव्याश-पोट्याशपामिटेट +पोट्याशआसिटेट हायड्रो० का १८ हा ३४ आ २+२ पोहाआ का १६ हा ३१ पो २ आ+का २ हा ३ पोआ+हा२. वर लिहिलेलें वर्णन मि. राडीसन यांणी दिलेले आहे ते शास्त्रीय शोधासंबंधाने व व्यापारांत या रीतीने माल बनविण्याच्या कामी फायदेशीर असल्याने मुद्दाम येथे दिले आहे. कोपेहेगेन येथे डा. बाकच्या रीतीने मेणबत्या तयार करण्याच्या कारखान्यांत जे ओलिईक आसीड तयार होते, त्या ओलिईक आसिडाचे घट्ट स्निग्ध आसीड हल्ली या रीतीने बनवितात. मार्सेल्स येथें तर दररोज सुमारे १६५मण ओलिईक आसिडाचे घट्ट स्निग्ध आसीड या रीतीने बनवितात. या रीतीने काम करण्यांत एका विशेष प्रकारच्या यंत्राचा उपयोग करितात. त्या यंत्रास काडतूस ह्मणतात. त्याची आकृती चित्र नं. ५ मध्ये दिली आहे ती पहा.