पान:मेणबत्त्या.pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्याश महाग असल्याने सोडा सलफाईटच वापरतात. बाकीची क्रिया वर प्रमाणेच करावी.. ६वीरीत. ६ वी रीत-पातळ स्निग्ध आसिडे व पातळ वनस्पतिज तेल या स्निग्ध पदार्थावर तीव्र सोड्याची क्रिया घडवून त्यांपासून घट्ट स्निग्ध आसीड तयार करणे. . मागील कोणत्याही रीतीनें मेणबत्यांचे द्रव्य तयार केलें ह्मणजे पातळ 0 ओलिईक आसीड ते त्यापासून नेहमी बरेंच निघत असते. आणि ते पातळ असल्यामुळे त्याचा उपयोग मेणबत्या करण्याच्या कामी होत नाही. मेणबत्यांचे द्रव्य तयार करण्याच्या कामी वापरलेल्या स्निग्ध पदार्थांचा घट्टपणा जितका कमी असेल तितक्या जास्त प्रमाणाने हे पातळ ओलिईक आसीड त्यापासून निघत असते, ओलिईक आसीड हे अम्ल असल्यामुळे धातूच्या पदार्थावर याचा काट चढतो. यामुळे वंगणाच्या कामी याचा उपयोग होऊ शकत नाही. फक्त साबूच्या कामी मात्र याचा उपयोग होतो. पण याचा केलेला साबू जरासा नरम होतो. त्यामुळे धुण्याच्या कामाचा किंवा हलक्या प्रतीचा साबू बनविण्याच्या कामाशिवाय इतर कामांत या ओलिईक आसिडाचा उपयोग होत नाही. ह्मणून याचे काय करावे या विषयासंबंधी कारखानदार लोकांस मोठी अडचण पडली होती. यास्तव लियान्स शहरच्या मि. राडीसन नावाच्या गृहस्थाने शोध करून या पातळ ओलिईक आसिडाचे घट्ट स्निग्ध आसीड बनविण्याची युक्ति काढली. या युक्तीने आतां पाहिजे तितक्या ओलिईक आसिडाचे पुनः घट्ट स्निग्ध आसीड बनविता येते. व्यापारी रीतीने पातळ ओलिईक आसिडाचे घट्ट स्निग्ध आसीड बनविण्याच्या कामी बहुतेक युरोपांतील मेणबत्यांचे कारखानदार लोक हळी या युक्तीचा उपयोग करूं लागले आहेत. .