पान:मेणबत्त्या.pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३३८-३५६° फा. अंशांपावेतों उष्णता देऊन नऊ तास शिजवावें. या वेळेस त्या मिश्रणाच्या दर चौरस इंचावर . ११९ पौंडांचा दाब पडत असतो. सबब एवढ्या दाबाने तें पंचपात्र फुटूं नये इतकें तें मजबूत असावे. त्या मिश्रणाची उष्णता ३९२° फा. अंशापेक्षां कधीही जास्त होऊ देऊ नये अशी खबरदारी ठेवावी. नंतर उष्णता बंद करून ते मिश्रण बरेंच थंड (२१२° फा. अंश) झाल्यावर खालच्या काकने बाहेर काढावे, त्यांत ४०० शेर गरम पाणी मिळवून धुवावे. नंतर तयार झालेल्या स्निग्ध आसिडांचे उर्ध्वपातन करून ती स्वच्छ करावी. नंतर थंड व गरम दाब देऊन त्यांतील घट्ट स्टिअरीक आसीड निराळे काढावें. प्रकार ३ रा. ५ व्या रीतीचा ३ रा प्रकार-या प्रकारानें काम करण्यात वरील दुसन्या प्रकाराप्रमाणेच भांडी वगैरे सामान लागते. फक्त सलफ्युरस आसिडाबद्दल सोडा बायसलफाईट किंवा पोट्याश बायसलफाईट वापरावा लागतो. सोडाबायसलफाईट तयार करण्याची रीत तीव्र ( कास्टीक ) सोडा भाग ४ वजनानें. सलफ्युरस आसीड , २ , गोडे पाणी याप्रमाणे पदार्थ शिशाची कल्हई केलेल्या एका कढईत टाकून पाव तास ते मिश्रण उकळावे ह्मणजे सर्व एकजीव होते. यासच सोडा बायसलफाईटचा द्रव ह्मणतात. याप्रमाणे तयार केलेला सोडा धायसलफाटईचा द्रव ८-१० शेर घेऊन १०० शेर स्निग्धपदार्थात मिळवून या रीतीच्या दुसऱ्या प्रकाराप्रमाणेच काम करावें. पोट्याश सलफाईटचा द्रव, सोडा सलफाईढच्या. द्रवाच्या प्रमाणाने तीव्रपोट्याश घेऊन तयार करावा. पण पो