पान:मेणबत्त्या.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३


कसे काढावे, त्याची परीक्षा व इतर उपयोग यांची पुष्कळ माहिती या भागांत दिली आहे. तसेच हा पदार्थ केव्हां व किती तयार होऊ लागला याचे कोष्टक याच भागांत दिलें आहे.
 भाग ९ वा-याकामी मुद्याच्या ज्या सूचना कराव्या असे वाटले या या भागांत दिल्या आहेत.
 साबू पुस्तक ग्राहकाकडे गेल्यानंतर अशी कामें अनुभविक रीतीने शिकण्याची इच्छा करणारे गृहस्थ बरेच आहेत, असे झालेल्या पत्र. व्यवहारावरून समजले. "त्यापैकी कित्येकांस तुमच्या शिकण्याची सोय करण्याचा विचार आहे.” असेंही उत्तर मजकडून गेले; परंतु साबूची कला शिकण्याचा वर्ग काढणारास पुरेशा द्रव्याची मदत मिळून वर्ग चालेल किंवा नाही याची शंका आल्यामुळे हे काम आजपर्यंत मागें पडले आहे. मी सरकारी नोकर असल्याने एकाच ठिकाणी माझें राहणे होत नाही. मी देहगांव मुक्कामी होतो, त्यावेळी ४।५ खाजगी नोकर ठेवून साबूचा लहानसा कारखाना काढला होता. तो कारखाना चांगला चालला होता. परंतु तेथून बदली झाल्यामुळे तो कारखाना बंद पाडावा लागला.
 आज पावेतों १०।१२ गृहस्थ मज जवळ राहून साबची कला शिकून गेले आहेत. त्या पैकींच रा. रा. मनोहर वासुदेवजी व्यास मु० देवास हे गृहस्थ मजजवळ ५।६ महिने राहून साबूची कला शिकले आहेत. यांचा साबू पहिल्या प्रतीचा असल्याबद्दल खा. ब, केमीकल अनालाईझर साहेब निसबत श्री. गायकवाड सरकार यांनी त्याची रसायनीक रीतीने परीक्षा करून सरटीफीकेटही दिलें आहे. तसेंच यांचे साबू पाहून रा. रा केसरीकारानी ता. ११५१०६