पान:मेणबत्त्या.pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तयार होते. ते मिश्रण स्थिर ठेवलें ह्मणजे वर पुनः स्निग्ध आसिडें जमतात ती काढून घ्यावी. या मिश्र स्निग्ध आसिडांतील पातळ आसीड हलक्या दाबाने निराळे करून बाकी राहिलेला घट्टसा गोळा उर्ध्व पातनाचे यंत्रांत घालून त्याचे उर्ध्व पातन करावें मगजे स्वच्छ व घट्ट जें स्टिअरीक आसीड ते तयार होते. यांत जर काही पातळ आसिडाचा भाग शिलक आहे असे दिसले तर गरम दावाने ते दाबून काढावें. - याप्रमाणे पातळ तेलाच्या १०० भागापासून ४०-४३ भाग पा तळ आसिड व ५५-६० भाग घट स्निग्ध आसिड तयार होऊ शकते. व त्याचे पातळ होण्याचे उष्णमान १५९° फा. अंश असते. प्रकार २ रा. ५ व्या रीतीचा २ रा प्रकार-यांत सलफ्युरस आसिडाची क्रिया तेलावर किंवा चरबीवर घडवून घट्ट स्निग्ध आसीड तयार करितात. या कामी एक लोखंडी बंद पंचपात्र लागते. या पंचपात्रास आंतून शिशाची कल्हई केलेली असावी. व त्यास पातळ पदार्थ आंत टाकण्यास्तव वरती एक काक व तो बाहेर काढण्यास्तव खाली एक काक असे दोन काक लागू करावे. हे लोखंडी पंचपात्र फार मजबूत केलेले असावे. नाही तर त्यांत मिश्रण शिजवितांना ते फुटण्याचे भय असते. काम करण्याची माहिती-मि. स्टीन व मा. डी. रोबो या गृहस्थांनी या प्रकारानें काम करून मेणबत्यांचे द्रव्य तयार करण्याचे पेटंट घेतले आहे. वर सांगितलेले लोखंडी पंचपात्र भट्टीवर ठेवावे. त्यांत १०० शेर - एबी किंवा इतर पातळ स्निग्ध पदार्थ टाकावा. त्यांत २॥-३ शेर उफ्युरस आसीड मिळवून वरचा काक बंद करावा. त्या मिश्रणास