पान:मेणबत्त्या.pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१ला प्रकार. ६ व्या रीतीचा १ ला प्रकार-सलफ्युरीक आसिडाने पातळ तेलापासून घट्ट स्निग्धआसीड तयार करणे. ही युक्ति मि. मुलर जाकोब या गृहस्थाने काढिली आहे. या प्रकारानें काम करण्यास एक लोखंडी कढई लागते. हीस आँतून शिशाची कल्हई केलेली असून, तळाशी एक काक असतो. तो शिवाय एक उर्ध्वपातनाचे यंत्र व सलफ्युरीक आसीड व उष्णता मापक यंत्र इतके सामान लागते. हे काम करितांना विस्तवाची उष्णता दिली तरी चालते. काम करण्याची माहिती-वनस्पतिज किंवा प्राणिज कोणतें ही पातळ तेल १०० शेर घेऊन कढईत टाकावे. त्यास १४० फा. अंशपर्यंत गरम करावे. नंतर त्यांत ६५° बाम हायडामिटर अंशाचें सलफ्युरीक आसीड ३०-४० शेर ढवळून ढवळून मिळवावें. म्हणजे स्या मिश्रणाचा रंग काळा ठिकर होतो व तें घ होते. पुढे तें मि. श्रण ९६° फा. अंशपर्यंत थंड होऊ द्यावे. उष्णता मापक यंत्राने ही उष्णता व थंडी मापून पहावी. तसे झाल्यानंतर त्यांत २६०-२८० शेर गोडे व थंड पाणी मिळवावें. हे पाणी मिळवितांना ते वारंवार ढवळीत जावें. नंतर २४ तासपर्यंत हे मिश्रण सतत उकळावें. म्हणजे गंधकाचे स्निग्धआसीड ( सलफोफ्याटी आसीड ) तयार होते. उष्णता बंद करावी. नंतर ते मिश्रण स्थिर ठेवावे. म्हणजे वरती काळा ठिकर व घट्ट गोळा जमतो व खाली अती आंबट पाणी रहाते. कढईचा काक उघडून तिच्यांतील आंबट पाणी काढून टाकावे व काक बंद करावा. त्या गोळ्यावर ४.०००-६०० शेर थंड पाणी टाकून कढईखाली उष्णता सुरू करावी. मध्येमध्ये ढवळून ते मिश्रण सतत दोन दिवस उकळावे. म्हणजे सलफोफ्याटी आसिडाचे स्टिअरीक आसिडासारखें घट्ट स्निग्धआसीड