पान:मेणबत्त्या.pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५८ .३ री क्रिया कठिण स्निग्ध द्रव्योत्पादन--तयार झालेल्या मिश्र स्निग्ध आसिडांत पातळ व घट्ट अशा दोन्ही जातीची स्निग्ध आसिडें मिश्र असतात. व मेणबत्त्या बनविण्यास तर कठिण पांढऱ्या द्रव्याची जरूर असते. सबब त्या मिश्र स्निग्ध आसिडांतील जे पातळ स्निग्ध आसीड ते बाहेर काढावे लागते. म्हणजे बाकी कठिण व पांढरें स्निग्ध आसीड ( स्टिअरीक आसीड) रहाते. तेंच मेणबत्त्या करण्याचे द्रव्य होय. यास्तव थंडा व गरम दाब करण्याची किया त्या स्निग्ध आसिडावर ठेविली आहे. याप्रमाणे कोणत्याही रीतीने काम केले तरीही पण तीन मुख्य क्रिया कराव्या लागतात; व बाकीच्या क्रिया त्या त्या प्रकाराने काम करण्याच्या धोरणाप्रमाणे कम जास्त कराव्या लागतात. नवीन मनुध्यास या कामाची चांगली वाकबगारी होण्यास्तव मुद्दाम हे स्पष्टीकरण केले आहे. वारीत. ५ वी रीत-प्राणिज व वनस्पतीज तेलावर सलफ्युरीक किया सलफ्युरस आसिडांची क्रिया घडवून त्यांचे घट्ट स्निग्ध आसीड तयार करणे. वरच्या चार रीतींनी मेणबत्याचे जे द्रव्य तयार करितात त्याकामी फक्त घट्ट असणारे ( जास्त उष्णमानावर पातळ होणारे ) मूळ स्निग्ध पदार्थ वापरतात. परंतु पातळ जातीच्या स्निग्ध पदार्थापासूनही स्टिअरीक आसिडासारखें घट्ट स्निग्ध आसीड तयार करण्याचा शोध उद्योगी पुरुघांनी लाविला आहे. या रीतीने स्निग्ध ( वनस्पतिज किंवा प्राणिज ) तेलांतील बहुतेक पातळ आसिडास घट्ट करण्याच्या कामी सलफ्युरीक, आसीड, किंवा सलफ्युरस आसीड अथवा आलकलाईन बायसलफेट इतक्या पदार्थाचा उपयोग करितात, म्हणून या रीतीचेही. ३ प्रकार ठरविले आहेत,