पान:मेणबत्त्या.pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५७

 तात्पर्य- कोणत्याही रीतीने काम केले तरी मेणबत्त्यांचे कठिण द्रव्य तयार करतांना स्निग्ध पदार्थावर मुख्य तीन क्रिया कराव्या लागतात. त्यापुढे लिहिल्या आहेत--
 १ ली क्रिया पृथक्करण-स्निग्ध पदार्थाच्या घटकांचे पृथक्करण करणे. हे पृथक्करण कळीचुना, म्यागनेशीआ, जस्ताचा आक्साईड किंवा बरायटा यापैकी कोणत्याही आलकलीने त्या स्निग्धपदार्थाची साबणक्रिया करून करावें; किंवा सलफ्युरीक आसिडाची अम्लक्रिया त्या स्निग्धपदार्थावर घडवून करावें. स्निग्धपदार्थाचे पृथक्करण झाल्याशिवाय त्यांतील स्निग्ध आसिडें निराळी होऊ शकत नाहीत. म्हणून ही क्रिया पहिली व मुख्य मानली आहे.
 २ री क्रिया साफीकरण ( स्वच्छकरणे )-वरच्या पहिल्या क्रियेने स्निग्धपदार्थातील स्निग्ध आसिडें निराळी होतात पण त्यांचा रंग काळा, काळसर, तपकिरी किंवा लालसर असा असतो. तो वाईट रंग सुधारण्यास ती स्निग्ध आसिडें अम्लपाण्यांत धुवावी, गरम · पाण्यांत धुवावी किंवा कमी जास्त उष्णमानावर त्यांचे उर्ध्वपातन करावें. म्ह. णजे त्यांचा रंग सुधारतो. उर्ध्वपातनाने स्निग्ध आसिडांचा रंग सुधारतो खरा पण त्यांचे उर्ध्वपातन करतांना दिलेल्या उष्णतेच्या मानाप्रमाणे स्वच्छ केलेल्या स्निग्ध आसिडांच्या रंगांत फेरफार असतो. तो फेरफार खाली लिहिला आहे.
 ४६४° फा. अंशाच्या उष्णतेवर उर्ध्वपातन केलेल्या स्निग्ध आसिव डांचा रंग पांढरा असतो; ५००° फा. अशांवरच्यांचा किंचित पिवळट किंवा काळसर ५५४ फा. अंशावरच्यांचा जास्त पिवळट किंवा जास्त काळसर; व ५७२ अथवा जास्त फा, अंशावरच्याचा पिवळा व तपकिरी रंग असतो. या धोरणाने स्निग्ध आसिडांचे उर्ध्वपातन करावें,