पान:मेणबत्त्या.pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५६

 २ रा प्रकार–सलफ्युरीक आसीडाची क्रिया स्निग्ध पदार्थावर तांब्यांच्या भांड्यांत घडवितात. यांत मूळच्या स्निग्ध पदार्थाच्या जातीप्रमाणे व त्या मिश्रणास द्यावयाच्या उष्णतेच्या मानाप्रमाणे सलफ्युरीक आसीड कमजास्त मिळवितात. सलफ्युरीक आसीडाच्या योगानें स्निग्ध पदार्थात असणारें में पातळ ओलिईक आसीड त्याचा काही भाग घट्ट होतो; त्यास इलेडीक आसीड म्हणतात. याकारणामुळे तयार होणा या स्टिअरीक आसिडाचे प्रमाण जास्त निघू शकते. म्हणूनच दुसऱ्या रीतीपेक्षा या मिश्र प्रकाराचा उपयोग मेणबत्त्यांचे कारखानदार लोक अधिक करतात. यांतही डा. बॉकची रीत अधिक उपयोगी व कमी खर्चाची आहे. या प्रकारांत तिसया, दुसऱ्या व नंतर पहिल्या रीतीप्रमाणे मिश्र असें काम करावे लागते. या प्रकारांत त्या मिश्रणास २४०-२५०° फा. अंशपर्यंत व कधी कधी तर ३३०° फा. अंशपर्यंतही उष्णता देतात.
 ३रा प्रकार-कोणी दुसऱ्या रीतीने स्निग्ध पदार्थाचे पृथक्करण करून नंतर थंडा व गरम दाब देऊन स्टिअरीक आसीड तयार करतात. म्हणजे दुसन्या व पहिल्या रीतींचा मिश्र उपयोग करतात.
 ४ था प्रकार-कोणी सल्फ्युरीक आसिडाची अम्लक्रिया स्निग्ध - पदार्थावर घडवून ते मिश्रण अति उष्णवाफेनें शिजवून त्याचे पृथकरण करतात. नंतर त्या मिश्र स्निग्ध आसिडास स्वच्छ करण्यास्तव त्याचे अति उष्ण वाफेने उर्ध्वपातन करतात. नंतर थंडा व गरम दाब देऊन स्टिअरीक आसीड तयार करतात. या प्रकारांत तिसया, दुसन्या व नंतर पहिल्या रीतींचा मिश्र उपयोग करावा लागतो; याशिवायही बारीकसारीक मिश्र प्रकार बरेच आहेत.