पान:मेणबत्त्या.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५५

स्निग्ध आसीड बाहेर काढावे. ह्मणजे पिशव्यांत कठीण, पांढरें, स्टिअरीक आसीड राहते. तें चाकूनें खरवडून काढून गरमीने पातळ करून त्याचे मोठाले गठे ओतावे. घट्ट झाल्यावर ते गठे साचांतून काढून मेणबत्या करण्याकरिता कोठारांत ठेवावें.
 या प्रकाराने दर १०० भाग चरबीतून ५९-६० भाग स्टिअरीक आसीड व ३८-३३ भाग ओलिईक आसीड ( पातळ ) तयार होते. या पातळ ओलिईक आसिडांतही घट्ट आसीड बरेंच शिल्लक असते; व २ भाग स्निग्ध आसिडें ३ ज्या क्रियेंत जळाल्याने कमी होतात. या प्रमाणे १०० भाग चरबी पासून निघणाऱ्या ९६ भाग स्निग्ध आसिडांचा हिशेब आहे.

४ थी रीत.

 ४ थी रीत-वरील रीतींपैकी दोन किंवा तिन्ही रीती मिळून स्निग्ध पदार्थापासून घट्ट स्निग्ध आसीड तयार करणे. या मिश्र रीतीचाच बहुतेक श्रीमंत कारखानदार लोक उपयोग करितात, या रीतीचे चार प्रकार आहेत.
 १ ला प्रकार-कळीचुना, म्यागनेशिया, किंवा बरायटा या पैकी कोणत्याही एका तीव्र आलकलीचे थोडें प्रमाण घेऊन पाण्यांत मिश्र करून ते मिश्रण स्निग्ध पदार्थात मिळवून नंतर आटोक्लेव्ह प्रोसेस. (२ या रीतीने ) शिजवितात. मगजे स्निग्ध पदार्थाचे पृथकरण होऊन बहुतेक ग्लिसराईन हाती लागते. नंतर स्निग्ध आसिडें निराळी काढून स्वच्छ करून थंड्या व गरम दाबाने घट्ट स्निग्ध आसीड तयार करितात. या प्रकारांत पहिल्या व दुसन्या रीतींचा उपयोग एकत्र करावा लागतो.