पान:मेणबत्त्या.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५४

असल्याने ते दोन्ही पदार्थ एकमेकांत मिश्र अशा स्थितीत आहेत. यावेळी दरेकाचे वि. गुरुत्व सुमारे ०.९ आहे. सबब एका पदार्थाचें वि. गु. जास्त झाल्याशिवाय तो जड होऊन तळी बसणार नाही. यास्तव त्या हौदांत अति उष्ण वाफ सोडून ते मिश्रण १-३ तास शिजवावें. या योगें आलबुमेनच्या काळ्या वेष्टणांचे वि. गु. १.३ होते व स्निग्ध आसिडांचे वि. गुरुत्व ०.९ कायम रहाते. व स्निग्ध आसिडापेक्षां आलबुमेनची काळी वेष्टणे जास्त जड होतात. त्यामुळे ती त्या मिश्रणाच्या तळीं बसतात व स्निग्ध आसिडें वर येतात. असे झाले झणजे शिजविणे बंद करावे व तें मिश्रण स्थिर ठेवावें.
 ४ थी क्रिया. स्वच्छ करणे-नंतर वर जमलेली स्निग्ध आसिडें जी या वेळेस बरीच काळी दिसतात ती काढून घेऊन दुसन्या हौदांत टाकावी. त्यांत ४०० शेर गरम पाणी मिळवून ते मिश्रण खूप जोराने अर्धा तास ढवळावे. नंतर स्थिर ठेवावें. पुनः खालचे पाणी काढून टाकून नवें ४०० शेर गरम पाणी त्यांत मिळवून अर्धा तास जोरान ढवळवावें. याप्रमाणे तीन चार वेळ गरम पाण्याने धुण्याची क्रिया कराकी झणजे त्या स्निग्ध आसिडाचा रंग नाहीसा होऊन ती बहुतेक पांढरी होतात. इतके करूनही जर त्यांचा काळसर रंग गेला नाही तर उर्ध्वपातनाची क्रिया करून ती आसिडें स्वच्छ करावी. पण तीन चार वेळ ती आसिडें धुतली असता ती पुष्कळ स्वच्छ होतात. नंतर तें मिश्रण स्थिर ठेवावें.
 ५ वी क्रिया. थंडा व गरम दाब करणें-त्या मिश्रणाच्या वर च्या भागी जमलेली स्निग्ध आसिडे काढून घेऊन जराशी घट्ट झाल्यावर क्यानवासच्या कापडाच्या किंवा लोकरीच्या पिशव्यांत ती भरून मागें लिहिल्याप्रमाणे त्यांजवर थंडा व गरम दाब देऊन त्यांतील पातळ