पान:मेणबत्त्या.pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१५३

काळसर होतो. फार काळा रंग होऊ नये इतक्या बेताचे सलफ्युरीक आलीड मिळवावे. हे काम नाजूक असल्याने प्रथम लहान प्रमाणावर काम करून अनुभव मिळविल्यानंतर मोठ्या प्रमाणावर काम करावें. या वेळेस खन्या स्निग्ध पदार्थाच्या कणा सभोवती असलेली आलबु. मेन नामक द्रव्याची वेष्टणे मात्र सलफ्युरीक आसिडाने द्रवीभूत होऊन काळी होतात. त्या वेष्टणांच्या आंत असणा-या खया स्निग्ध पदार्थावर त्या सलफ्युरीक आसिडाचा जरा पण असर होऊ देऊ नये. ह्मणजे क्रिया पुरी झाली. उष्णता १२०° फा० अंश, जोराने व जलद ढवळणे, व त्या मिश्रणाचा रंग किंचित् काळसर इतक्या गोष्ठी फार काळजीपूर्वक कराव्या.
 २ री क्रिया पृथक्करण---पहिली क्रिया झाल्यानंतर व खन्या स्निग्ध पदार्थाचे कण ( ज्यावर सलफ्युरीक आसिडाचे कार्य अद्याप घडविलें नाहीं असें ) पृथक्करण करण्यास योग्य अशा स्थितीत असतात. या वेळेस सलपारीक आसीड ४-४॥ शेर घेऊन ६-८ शेर गोड्यापाण्यात मिळवावे. हे अम्ल मिश्रण त्या काळसर मिनणांत ढव. कन ढवळून मिळवावे. हे मिश्रण १८०°--२००° फा.. अंश उष्ण तेवर मध्ये मध्ये ढवळून अर्धा तास गरम करावे. नंतर स्थिर ठेवावें. ह्मणजे खऱ्या स्निग्ध पदार्थाचे पृथक्करण होऊन त्याचे घटक जे ग्लिसराईन व स्निग्ध आसिडें ती रसायन संयोगाने निरनिराळी होऊन यांत्रीक संयोगाने एकत्र स्थितीत रहातात. स्थिर झाल्यावर खाली जमलेले गोडपाणी ( ग्लिसराईन युक्तपाणी) खालच्या कॉकने काढून दुसरीकडे ठेवावें.
 ३री क्रिया भिन्नीकरण-आतां त्या हौदांत फक्त काळी झालेली (थोडी जळालेली) आलबुमेनची वेष्टणे व काळी स्निग्ध आसिडे हे दोन पदार्थ आहेत. या दोहोंचेही विशिष्टगुरुत्व सारखें