पान:मेणबत्त्या.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५२

 ५ काम करतांना स्निग्ध पदार्थ उघड्या भांड्यात घालून वाफेनें शिजवावा लागतो म्हणून कोणत्याही प्रकारचा धोका ( भांडे फुटणे व इजा होणे वगैरे ) उत्पन्न होत नाही.
 पांचही क्रिया दोन तीन साध्या भांड्यांतच करता येतात. त्यामुळे मेहनत व वेळ कमी लागून खर्च कमी होतो.
 ७ प्राणिज व वनस्पतिज या दोन्ही जातींच्या स्निग्ध पदार्थावर या प्रकाराने क्रिया घडवून स्टिअरीक आसीड तयार करता येते. इतके फायदे आहेत.
 या प्रकाराने काम करण्याची माहिती- या प्रकाराने काम करण्यास लोखंडी किंवा लांकडी हौद तीन चार तयार करावे. लोखंडी हौद असल्यास त्यांस आंतून शिशाची कल्हई केलेली असावी किंवा लाकडी हौद असल्यास त्यांस आंतून शिशाचे पत्रे जडलेले असावे. या प्रत्येक हौदांत वाफेची नळी व कॉक लागू केलेला असावा. विस्तवाने काम करणे असल्यास हौद भट्टीवर बसवावे व दरेकास खाली एकेक कॉक लावावा. कॉक नसल्यास पंपाच्या साह्याने एकांतील द्रव्य दुसन्यांत नेण्याची सोय करून ठेवावी. जवळ गोडे पाणी व सलफ्युरीक आसीड तयार ठेवावें.
 १ ली क्रिया---एका हौदांत १०० शेर स्निग्ध पदार्थ टाकून वाफेच्या किंवा विस्तवाच्या उष्णतेने १२०°--१३०° फा० अंश गरम करावा. नंतर त्यांत सलफ्युरीक आसीड १.-२ शेर थोड थोडे मिळवून ढवळीत जावे. ढवळण्याची क्रिया फार जलदीने करावी झणजे एकाच ठिकाणी सलफ्युरीक आसीड न राहातां खया स्निग्ध पदार्थाच्या आलबूमेन नामक. द्रव्याच्या सर्व वेष्टणांचा नाश करते. या प्रमाणे ढवळून ढवळून सलफ्युरीक आसीड मिळविले झणजे त्या मिश्रणाचा रंग किंचित