पान:मेणबत्त्या.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५१

 या प्रकाराने काम करतांना स्निग्ध पदार्थातील पातळ जें ओलिईक आसीड त्याज बरोबर सलफयुरीक आसिडाचे सांनिध्य जास्त वेळ झाल्याने त्या ओलिईक आसिडाचा काही भाग घट्ट होतो. यामुळे या प्रकाराने तयार केलेले स्टिअरीक आसीड जास्त कठीण व जास्त प्रमाणाचे निघू शकते. हा या प्रकाराने काम करण्यांत दुसरा फायदा आहे. हा शोध मि. बोर्नमॅन व मि. क्राट यांनी लाविला व डा. बॉक यांनी सिद्ध करून दाखविला. डा. बॉक तर असें ह्मणतात की मूळ स्निग्ध पदार्थ चरबी असल्यास पातळ आसीड बाहेर निघणे हे जे थंड्या दाबाचे कार्य तें या प्रकाराने काढलेल्या मिश्र स्निग्ध आसिडांवर होऊ शकत नाही. फक्त गरम दाबाचे कार्य मात्र त्याजवर होऊ शकते. तसेंच गरम दाबाने निघालेल्या पातळ आसिडांतही घट्ट आसीड बरेंच शिल्लक असते.
 १ इतर प्रकराने काम करून निघणाऱ्या स्टिअरीक आसिडाच्या प्रमाणापेक्षा या प्रकाराने काम करून निघणाऱ्या स्टिअरीक आसिडाचें प्रमाण जास्त असते. शंभर भाग चरबी पासून ६०-६३ भाग स्टिअरीक आसीड निघू शकते.
 २ या प्रकाराने तयार केलेल्या स्टिअरीक आसिडाचे पातळ होण्याचे उष्णमान १३६०-१४० फा० अंश असते.
 चुन्याच्या साबण क्रियेने केलेल्या स्टिअरीक आसिडासारखाच या प्रकाराने तयार झालेल्या स्टिअरीक आसिडाचा रंग असतो. व हे त्याज. पेक्षा अधिक कठीण असते.
 ४ या प्रकाराने में ग्लिसराईन निघू शकते त्याचे प्रमाण १०० भाग चरबीपासून ६२ भाग १.१९ विशिष्टगुरुत्वाचे व शुद्ध ग्लिसराईन इतके असते. या ग्लिसराईनमध्ये सेंद्रिय जातीचें आसीड जरा पण नसते.