पान:मेणबत्त्या.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२



गुण त्यांत आणावे लागतात. सबब ती पूर्ण माहिती व आकार जाडी लांबी यांचे धोरण यासंबंधी माहिती या भागांत दिली आहे.
 भाग ७ वा-मेणबत्या बनविणें-येथपर्यंत घट्ट द्रव्य व वाती हे सामान तयार करण्याची माहिती दिली. आता ही दोन्ही द्रव्ये एकत्र करून मेणबत्त्या बनविण्याचे काम कसे करावें; तसेच या कामी लागणारे साचे व ते गरम व थंड करण्यास लागणारी वाफ व नळ आणि इतर भांडी यांचे वर्णन दिले आहे. तसेच हे वर्णन झटकन लक्षात येण्यास्तव चित्रे व त्यांचे सविस्तर वर्णनही दिले आहे. मूळव्याप्रमाणे मेणबत्यांचा आकारही तीन प्रकारानी बनवितात, १ मेणबत्त्यांच्या द्रव्यांत वाती बुचकळणे २ द्रव्य वातीवर ओतणे ३ व वाती ठेविलेल्या साच्यांत द्रव्य ओतणें (यांत हातदिवेही येतात) असे निरनिराळे प्रकार आहेत. तसेच मेणबत्त्यास कळ्या करणे इत्यादि वर्णन दिले आहे. पुढे मेणबत्त्या तयार झाल्यावर बाजारांत पाठविण्या योग्य त्यांची पुडकी बांधून पेट्या भरण्याची माहितीही याच भागांत दिली आहे. मेणबत्त्यांचे इतर प्रकार जसे रंगित, पिळदार मेणबत्त्या यांचे वर्णन दिले असून किती मनुष्य किती वेळांत किती वजनाच्या मेणबत्या कोणत्या साच्यावर करूं शकतात, याचीही माहिती याच भागांत दिली आहे.
 भाग ८ वा-ग्लिसराईन-मेणबत्त्याचे द्रव्य तयार करतांना ओलीईक आसीड व ग्लिसराईन हे आनुषंगिक पदार्थ तयार होतात, पण ते मेणबत्त्यांचे कामी येत नाहीत, सबब ते फुकट जाऊं नयेत मणून, ओलीईक आसिडाचे घट्ट स्निग्ध आसीड बनविण्याची माहिती भाग ५ मध्ये पान १६२ पासून दिली आहे. आतां राहिलेलें जें ग्लिसराईन ते पाण्याशी मिश्र असें निघते. त्यापासून शुद्ध ग्लिसराईन