पान:मेणबत्त्या.pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५०


 ४ थी क्रिया.स्वच्छ करणे-नंतर त्या मिश्रणांत वरच्या बाजूस स्निग्ध आसिडें व खाली ती काळी झालेली वेष्टणे जमतात. वरची स्निध आसिडे काढून घेऊन दुसया हौदांत टाकावी. नंतर त्यांच्या चौपट गरम पाणी त्यांत मिळवून ते सर्व मिश्रण खूप जोराने ढवळावें नंतर स्थिर ठेवावे. ह्मणजे सलफ्युरीक आसिडाचा भाग पाण्यांत राहून स्निग्ध आसिडें घर जमतात. खालचे पाणी काढून टाकून पुनः या प्रमाणे दोन वेळ गरम पाण्याने धुण्याची क्रिया करावी ह्मणजे ती स्निग्ध आसिडें स्वच्छ होतात. येथें ही क्रिया पुरी झाली. वाटल्यास ती स्निग्ध आसिडें उर्ध्व पातनाने गाळून काढून स्वच्छ करावी. स्वच्छतेची विशेष जरूर असल्यास उर्ध्वपातनाची क्रिया करावी.
 ५ वी क्रिया. थंडा व गरम दाब-स्वच्छ केलेल्या स्निग्ध आसडांत पातळ व घट्ट अशा दोन जातींची स्निग्ध आसिडें मिश्र असतात. ती निराळी करावी लागतात. मागें लिहिल्याप्रमाणे थंडा व गरम दाब देऊन पातळ आसीड घट्ट आसीडापासून निराळे करावे. या ठिकाणी मूळ स्निग्ध पदार्थ चरबी असल्यास थंड्या दाबाने थोडे पण पातळ आसीड बाहेर निघत नाही. ह्मणून ते बाहेर काढण्यास गरम दाबच करावा लागतो.
 याप्रमाणे पांच क्रिया करून डा. बॉक यांच्या रीतीने ह्मणजे तिस. न्या रीतीने चवथ्या प्रकाराने मेणबत्त्यांचे द्रव्य तयार करतात.
 खन्या चरबीवर आसिडाचे कार्य घडण्यापूर्वी जरी तिच्या काळ्या झालेल्या आलबुमेन नामक द्रव्याच्या वेष्टणांस उष्णता दिली तरीही ती जड होऊन तळी बसतात. कोणी स्निग्ध पदार्थाचे पृथक्करण करण्यापूर्वीच व कोणी पृथक्करण केल्यानंतर ही भिन्नीकरणाची क्रिया करतात. ही या प्रकारांत मोठी सुधारणा झाली आहे.