पान:मेणबत्त्या.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४८

पदार्थात असलेला आलबुमेन जळून जातो. खन्या चरबीचे कण सुटे होऊन त्यांचे पृथक्करण होते व बहुतेक ग्लिसराईन जळून जाते; ह्मणून चार झालेले द्रव्य (स्निग्ध आसिडें ) स्वच्छ करण्यास अति त्रासदाहव खराब अशा स्थितींचें बनतें. अम्लक्रिया जर बरोबर करतां ली तर ती प्रथम क्रिया आहे. या प्रथम क्रियेचा उद्देश फक्त आलन नामक द्रव्य कापलें, द्रवीभूत केले जावे किंवा जाळले जावे एवच आहे. खन्या चरबीवर सलफ्युरीक आसिडाचा असरही प्रथम .ा करतांना होऊ नये, पण सलफ्युरीक आसिडाची अम्लक्रिया 'नग्ध पदार्थावर केल्याने डबल आसीड झणजे सलफोफ्याटी आसीड तयार होते, ही जी नेहमीची कल्पना ती चुकीची आहे, ह्मणून जर बरोबर काळजीपूर्वक व विचाराने ही प्रथम क्रिया सलफ्युरीक आसिडाने चरबीवर केली तर खया चरबी भोवतालची आलबुमेन नामक द्रव्याची वेष्टणे (पडदे ) मात्र काळी होतात. सर्व स्निग्ध पदार्थ (चरबी) काळा होत नाही. ही काळी झालेली वेष्टणे चरबी (स्निग्ध पदार्थ ). मध्ये किंवा तिच्यांतील स्निग्ध आसिडामध्ये द्रवीभूत होणारी नसतात. जर ही प्रथम क्रिया करतांना १ सलफ्युरीक आसीड वाजवीपेक्षा जास्त वापरले; २ स्निग्ध पदार्थ व सलफ्युरीक आसीड यांचे मिश्रण फार वेळ एकत्र राहूं दिले; ३ किंवा त्या मिश्रणास जास्त उष्णता दिली तर तें मिश्रण काळ्या रंगाचे होते. स्निग्ध पदार्थावर ही प्रथम क्रिया करतांना वरच्या तिहांपैकी एकही दोष उत्पन्न होऊ देऊं नये झणजे चांगलें काम होते.
 प्रथम क्रिया झाल्यानंतर पुनः सलफ्युरीक आसीड त्यांत मिळवून खऱ्या स्निग्ध पदार्थाचे पृथक्करण करावे लागते व त्या योगें ग्लिसराईन काढून घेता येते, असे डॉ. बॉक यांचे झणणे आहे.