पान:मेणबत्त्या.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४७

राईन काढता येते. ही युक्ति देनमार्क देशांतील डॉ० बाक या गृहस्थाने काढिली आहे. त्यांच्या युक्तीने काम करण्याचा कारखाना कोपेनहेगेन येथे आहे.
 डॉ० बाक यांची या विषयाची मूळ कल्पना पुढे लिहिल्याप्रमाणे आहे. बाजारांत मिळणाऱ्या चरबीत खऱ्या चरबीचे लहान लहान कण आल्बुमेन नामक द्रव्याच्या बारीक पडद्यांत वेष्टिलेले असतात, आणि जोपर्यंत या आलबुमेन नामक द्रव्याच्या बारीक वेष्टणा (पडदे ) चा नाश झाला नाही, तोपर्यंत कोणत्याही द्रावक ( आसीड किंवा आलकली ) पदार्थाचे कार्य त्या आलबुमेनच्या आंतील ह्मणजे खया चरबीवर होऊ शकत नाही. नेहमीच्या साबण क्रियेमध्ये तीव्र आलकलीने ती आलबुमेनची वेष्टणे द्रवीभूत होऊन नाश पावतात किंवा तीव्र.सलफ्युरीक आसिडाने जळन खाक होतात. सबब ती वेष्टणेच जळन खाक होतील इतक्या बेताने सलफ्युरीक आसीड वापरले तर ती वेष्टणे जळून गेल्यानंतर त्यांच्यांतील खन्या चरबीचे कण पृथक्करण करण्यास योग्य अशा स्थितीत येतात व त्या बाकी राहिलेल्या (आलबुमेनच्या वेष्टणाच्या आंतील ) चरबीच्या कणांचे पृथक्करण २१२ फा. अंश गरम पाण्याने सुद्धा होऊ शकते. सबब अति उष्णता (auto-clave process) देण्याची रीत किंवा अति उष्णतेवर उर्ध्वपातन करण्याची रीत यांपैकी कोणत्याही भयंकर रीतीचा उपयोग चरबीचे पृथक्करण करण्यांत करावा लागत नाही, हा या युक्तीचा विशेष आहे.
 चुन्याच्या साबण क्रियेंत स्निग्ध पदार्थो ( चरबी )तील आलबुमेन द्रवीभूत होऊन चुन्याचा साबू तयार होतो व स्निग्ध आसिडाबरोबर रसायनसंयोगाने मिश्र असलेले ग्लिसराईन सुटे पड़न सहज निराळे करता येते, सलफ्युरीक आसिडाच्या अम्लक्रियेमध्ये स्निग्ध