पान:मेणबत्त्या.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४५

धुवून शेवटी मोठ्या साचांत ओतून मोठाले गहे तयार करून कोठारात ठेवावे. यासच पामिटीक आसीड ह्मणतात, हे घट्ट, चकाकीत व पांढरें असून त्याचे पातळ होण्याचे उष्णमान १२५० १.३०° फा. अंश असते.
 या एकट्या पामिटीक आसिडाच्या मेणबत्या करीत नाहीत. पण स्टिअरीक आसिडांत हे मिळवून नंतर त्या मिश्र द्रव्याच्या मेणबत्या तयार करतात. या मिश्र व घट्ट द्रव्याचे पातळ होण्याचे उष्णमान ४० पानावर लिहिले आहे ते पहा ह्मणजे मिश्रणाचे प्रमाण समजेल.
 याचप्रमाणे कोकबेल तेलापासून मेणबत्यांचे घट्ट द्रव्य तयार करून तें तुपापासून काढलेल्या स्टिअरीक आसिडांत मिळवून धर्मकृत्र लागणान्या मेणबत्या बनवाव्या.

३ रा प्रकार.

तिसऱ्या रीतीचा ३ रा प्रकार-या प्रकाराने हलक्या जाती स्टिअरीन ( मेणबत्त्याचे द्रव्य ) तयार करतात. लोकरीच्या कारखान्य लोकर कातण्याच्या वेळी तीस तेल लावावे लागते. तें तेल ती लोकर धतांना पाण्यांत मिळून गटरांत किंवा हौदांत निरुपयोगी म्हणून टाकून देतात. याचप्रमाणे लोकरीच्या कारखान्यांत लोकर व तिचे कपडे धतलेल्या पाण्यांत साबू व तेल हे पदार्थ असतात. ते पाणी खराब व निरुपयोगी म्हणून नदीत न सोडतां निराळ्या हौदांत सांठवितात. त्या पाण्यांतील तेल व त्या साबूतील तेलकट द्रव्य फुकट जाऊ न देतां त्याचें हलक्या प्रतीच्या मेणबत्त्यांचे द्रव्य तयार करतात. तो प्रकार खाली लिहिला आहे.
 ज्या हौदांत तें निरुपयोगी पण साबू असलेले पाणी असते त्यांत सलफ्युरीक आसीड टाकून ते मिश्रण खूप जोराने एक तासपर्यंत ढवळावे. त्या मिश्रणास अम्लध येईपर्यंत त्यांत सलफ्युरीक आसीड