पान:मेणबत्त्या.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४४

दुसरे कारखानदार हल्ली नुसत्या ताडाच्या तेलापासून पामिटीक आसीड पुष्कळ तयार करतात. दरवर्षी सुमारे २५ हजार टन ताडाचे तेल या कामी वापरले जाते. युरोपमध्ये मात्र ताडाच्या तेलावर जबर जकात असल्यामुळे त्याचा उपयोग फारसा करीत नाहीत. ताडाच्या तेलापासून पामिटीक आसीड तयार करण्याची रीत वरील प्रकाराप्रमाणेच आहे. परंतु थोडासा फेरफार आहे तो पुढे दर्शविला आहे.
 वरच्या प्रकाराप्रमाणे ताडाच्या तेलावर प्रथम अम्लक्रिया करावी. नंतर उर्ध्वपातनाने स्वच्छ केलेली मिश्र स्निग्ध आसिडे काढून घ्यावी. हीं मिश्र स्निग्ध आसिडें बरीच घट्ट असतात. सबब टेबलावर लागू केलेल्या फिरत्या सुरीवर त्यांचे मोठाले तुकडे धरून बारीक बारीक छिलटे ( काप ) तयार करावे. हे बारीक छिलटे क्यानवासच्या किंवा लोकरीच्या कपड्यांत सारखे पसरावे. उंच नीच नसावे. नंतर त्या कपड्यावर नारळाच्या चटईचे तुकडे गुंडाळून हायड्रालिक प्रेसमध्ये ठेवावे. नंतर त्यावर थंडा दाब ८०-८५°फा. अंश उष्णतेवर करावा. पुन्हां त्यावर गरम दाब ८५°-९०° फा. अंश उष्णतेवर करावा. हणजे त्यांतील पातळ में ओलिईक आसीड ते बाहेर निघते. पुढे अगदी घट्ट जे पामिटीक आसीड ते त्या कपड्यांतून चाकूनें खरवडून एका हौदांत टाकावे. तेथें तें गरमीने पातळ करून त्यांत अम्लपाणी (१०० भाग पाण्यांत २-३ भाग सल्फ्युरीक आसीड मिळविलेले, तितकेंच मिळवावे. हे सर्व मिश्रण सुमारे अर्धा तास उकळावे. नंतर स्थिर ठेवावे ह्मणजे पाणी खाली व स्निग्ध आसीड वर जमते. नंतर तें स्निग्ध आसीड काढून घ्यावे व त्याच्या चौपट गरम पाणी त्यांत मिळवावें. स्निग्ध आसीड घट्ट असल्यास जास्त गरम पाणी त्यांत मिळवून सर्व पातळ झाले झणजे खूप जोराने ढवळावे. नंतर स्थिर ठेवून वरचे स्निग्ध आसीड काढून घ्यावे. याप्रमाणे गरम पाण्यांत २।३ वेळ