पान:मेणबत्त्या.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११



फारच त्रासदायक म्हणून कठीण व खर्चाचे आहे. तरी पण उद्योगी लोकांस कोणतीही गोष्ट अवघड नाही. हे तत्व लक्षात आणन हे मेण शुद्ध करण्याच्या २१३ रीतींची माहिती या भागांत दिली आहे.
 भाग ५. वा-घट्ट स्निग्ध आसिडें-बाजारांत येणाऱ्या मेणबत्यांच्या जातीत घट्ट स्निग्ध आसिडापासून तयार केलेल्या मेणबत्यांचाच भरणा नेहमी जास्त असतो. व किंमतीनेही या जातीच्या मेणबत्त्या स्वस्त पडत असल्याने त्यांचा खप जास्त होतो.. सबब हा भाग या पुस्तकाचा मुख्य भाग समजला पाहिजे. या दृष्टीने यांत सर्व. लोकांस पसंत पडतील अशा प्राणिज व वनस्पतिज पदार्थापासून मेणबत्त्यांचे घट्ट द्रव्य बनविण्याची माहिती दिली आहे.― प्रथम मुख्य मुख्य रीती व त्यांचे वर्णन, देऊन नंतर या कामी लागणारी भांडी कढया, प्रेस व इतर सामान यांची सविस्तर माहिती ज्या त्या रितीखाली देऊन नंतर काम करण्याची अनुभविक माहितीही दिली आहे. याकामी प्रथम प्रथम , परस्थ लोकांचा भर चरबी व ताडाचे तेल, या दोन पदार्थावर फार होता. परंतु, हल्ली तिकडे शास्त्रीय शोधाचे परिश्रमाने वनस्पतीज.. तेलावर रसायनीक क्रिया घडवून मेणबत्यांचे घट्ट द्रव्य बनवितात. सबब देशी लोकांनीही याच कृतीचा अभ्यास करावा व वनस्पतीज तेलापासून मेणबत्त्या बनवाव्या, या हेतूने ही माहिती मुद्दाम सविस्तर या भागांत ५ व ६ रीतीमध्ये पान १५८ ते १८१ पर्यंत दिली आहे. या रितीचा उपयोग आपल्या लोकांनी अवश्य करून घ्यावा, अशी कळकळीची सूचना करून ठेवतो.
 भाग ६ वा-वाती-मेणबत्त्यांच्या कामी विशेष प्रकारच्या वाती लागतात. या वातीवर रसायनीक क्रिया करून अवश्य लागणारे