पान:मेणबत्त्या.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३४


 तोटे....१ भांडी फार फुटतात, २ काम करणा-या माणसास अति इजा होते. केव्हां केव्हां तीं मरतात. व ३ त्यामुळे मालाचे नुकसान होते.या प्रकारांनी काम करण्याच्या रीतीस इंग्रेजीत आटोक्केव्ह प्रोसेस म्हणतात.
 ३री रीत....सलफ्युरीक आसिडाने स्निग्ध पदार्थावर अम्लक्रिया घडवून घट्ट स्निग्ध आसिडें तयार करणे.
 दुसऱ्या रीतीनें मेणबत्त्यांचे द्रव्य तयार करतांना लागणारी भांडी फार मजबूत व प्रमाणबद्ध अशी असावी लागतात. पण ती तशी बहुतकरून होत नाहीत, त्यामुळे ती फुट्रन फार नुकसान होत, तसच दसऱ्या रीतीच्या पहिल्या प्रकारानें काम करतांना आक्रोलियन नावाचा अति जहरी वाफ उत्पन्न होते. या कारणास्तव वरील दोन्ही रीतीशिवाय करून मेणबत्यांचे द्रव्य तयार करण्याचा शोध सुरू झाला. या शाघाता असे समजले की, स्निग्ध पदार्थावर सलफ्युरीक आसिडाची क्रिया घडवूनही त्या स्निग्ध पदार्थाचे पृथक्करण करता येते, व या रीतीने स्निग्ध पदाथाचे पृथक्करण करतांना त्या स्निग्ध पदार्थातील ग्लिसराईन मात्र जळून जाते, एवढी उणीव प्रथम राहिली होती. परंतु डॉ. बॉकसारख्या शोधक व बुद्धीवान ( डच गृहस्थ) पुरुषाने या कामी सलफ्यु रीक आसीड वापरूनही, ग्लिसराईन वाया न जाऊं देता, स्निग्य पदार्थाचे पृथक्करण करण्याची युक्ति काढिली, तीमुळे या बाबतीत सुधारणेचे पाऊल पुढे पडलें व जगास एक मोठा फायदा झाला.
 या रीतीने काम करण्यांत थोडे फार फेरफार करितात, यामुळे या रीतीचेही चार प्रकार ठरविले आहेत.
 १ ला प्रकार--सन १८४१ सालीं मान. डब्रनफाट या फ्रेंच गृहस्थाने स्निग्ध पदार्थावर सलफ्युरीक आसिडाची क्रिया घडविल्यानंतर