पान:मेणबत्त्या.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३५

तें मिश्रण पाण्याबरोबर शिजवून नंतर उर्ध्वपातनाने त्यांतील स्निग्ध आसिडें निराळी काढावी असा शोध लावला. मि. जोन्स व मि० विलसन यांनी सन १८४२ व १८४३ साली प्राईस कंपनीच्या नांवावर याच प्रकाराने काम करण्याची दोन पेटंटें मिळविली. या प्रकारांत स्निग्ध पदार्थावर प्रथम सलफ्युरीक आसिडाची क्रिया (चुन्याच्या क्रियेप्रमाणे ) घडवून नंतर त्या मिश्र पदार्थावर पाण्याची क्रिया घडवि. तात; नंतर पृथक्करण पावलेली स्निग्ध आसिडें उर्ध्वपातनाने काढून घेतात, याप्रमाणे स्निग्ध पदार्थाचे पृथःकरण करून मेणबत्यांचे जे द्रव्य तयार होते ते पहिल्या दोन रीतींनी तयार झालेल्या द्रव्यापेक्षा प्रमाणाने अधिक पण रंगाने किंचित कमी पांढरें असें तयार होते. चुन्याच्या साबण क्रियेनें चरबीच्या १०० भागापासून स्टिअरीक आसीड ५०-५५ भाग निघतें तर याप्रकाराने तितक्याच चरबी पासून ६०-६५ भाग स्टिअरीक आसीड निघू शकते. पण चुन्याच्या साबण क्रियेने काढलेल्या स्टिअरीक आसिडापेक्षा, सलफ्युरिक आसिडाने काढलेले स्टिअरिक आसिडाचे पातळ होण्याचे उष्णमान जरा कमी व रंगही थोडा कमी पांढरा अशा त-हेचा माल तयार होतो.
 या प्रकाराने काम करण्यास लागणारी भांडी, उर्ध्वपातनाचे यंत्र, हौद नळ्या वगैरे सामान व त्याची मांडणी ध्यानात येण्याकरितां आकृ। ती नं. ४ चे चित्र दिले आहे ते पहा. या चित्राचे वर्णन.
  या चित्रांत दाखविलेल्या भांड्यामध्ये सलफ्युरीक आसिडाची क्रिया स्निग्ध पदार्थावर करण्याचे भांडे व उर्ध्वपातन करण्याचे भांडे व तदनुषंगिक हौद, पंप, नळ्या, भट्या वगैरेची संयुक्त योजना केलेली असते. हे यंत्र लंडन येथील मेसर्स मेरीवेदर व सन्स ही कंपनी तयार करते. दर वेळेस एक टन ह्मणजे कच्चे १५ मण स्निग्ध पदार्थावर सलफ्युरीक आसिडाची क्रिया घडवून उर्ध्व पातन करण्यास पुरेल