पान:मेणबत्त्या.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३२

 या तिसऱ्या प्रकारानें काम करण्यास खाली लिहिलेले सामान तयार करावे लागते. तीन इंच व्यासाचा लोखंडी नळ अर्धा इंच जाड पत्र्याचा करावा व तो नागमोडी आकाराचा ( खालून वर व वरून खाली) असा एका भट्टीत बसवावा.. सुमारे तीन फूट उंचीची एक ओळ अशा दहा बारा ओळी होतील इतका तो लांब असावा. त्यांपैकी अर्ध्या ओळी भट्टींत व अर्ध्या ओळी भट्टीबाहेर एका लोखंडी हौदांत बसवाव्या. या हौदाच्या बाहेरच्या बाजूस तो नळ काढून तेथे त्यास कॉक बसवावा. या कॉकाखाली दुसरा एक लोखेडी हौद ठेवावा. या दुसया हौदाच्या बुडाशी पण एक कॉक लावावा. त्या नळांतून मिश्रण सोडण्यास्तव त्यांस आरंभी एक शोषक यंत्र ( पंप) लागू करावें. या शोषक यंत्राचा जोर इतका असावा की ते मिश्रण त्या भट्टीतील नळाच्या वेटोळ्यांत शिरून भट्टींच्या बाहेरील नळांत जाई. पर्यंत वेळ दहा मिनिटे लागावा. याप्रमाणे शोषकयंत्राची गति ( दाब ) व भट्टींतील नळाची लांबी ठेवावी. मिश्रण गरम नळांत ( भट्टीतील नळांत ) दहा मिनिटें रहाण्यास शोषकयंत्राचा जोर व गती किती लागते या गोष्टीचा प्रथम अनुभव घेऊन नंतर या कामास सुरवात करावी असे मला वाटते.

 या तिसऱ्या प्रकाराने काम करण्याची माहिती-एका लोखंडी हौदांत स्निग्ध पदार्थ व पाणी समभाग टाकून ते मिश्रण पंपाने खूप ढवळून ढवळून एकजीव करावे. नंतर त्या भट्टीत विस्तव शिलगवून तो नळ ६१२ फा. अंश गरम करावा. नळ टाकलेल्या लोखंडी हौदांत थंड पाणी भरावे. नंतर त्या हौदांतून ढवळलेले मिश्रण पंपाने भट्टीतील नळांत सोडण्यास सुरवात करावी. मिश्रण गरम नळाच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे झणजे थंड पाण्याच्या नळांत जाईपयेत वरून खाली उतरतें व खालून वर चढते. अशा स्थितीत चढउतार