पान:मेणबत्त्या.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०


व इतर काय घडवून मेणबत्त्या तयार करतात, याची सचित्र माहिती या पुस्तकांत दिली आहे. तिचा तपशील खाली लिहिल्या प्रमाणे:―
 भाग १ ला-मेणबत्ती ह्मणजे काय व तिचा उपयोग केव्हापासून लोक करीत होते, तसेच या कामी शास्त्रज्ञ लोकांनी कसे कसे परिश्रम करून सुधारणा केली. याची शक्य तितकी माहिती अनेक पुस्तकांतून घेऊन मेणबत्त्या बनविण्याच्या रितीसह या भागांत दिली आहे.
 भाग २ रा-मेणबत्त्याचे कामी वापरली जाणारी मूळद्रव्ये त्यांचे वर्ग त्यांचे रसायनीक घटक व त्यांत असलेल्या घट्ट द्रव्याचें सामान्य प्रमाण इतकी माहिती या भागांत दिली आहे.
 भाग ३ रा-चरबी लॉर्ड स्टीअरीन, खोबऱ्याचे तेल, पाईनीतेल, व मधमाशाचे मेण, चिनीमेण, स्परम्यासिटी. कार्नोबा मेण, जपानी मेण, मिरटील मेण, व ताडाचे मेण या पासून मेणबत्यांचे कठीण स्निग्ध - द्रव्य तयार करण्याची माहिती या भागांत दिली आहे.
 भाग ४ था-प्याराफीन व ओझोकिरीट मेण ( खनिज) यांस तपासून व शुद्ध करून मेणबत्त्या बनविण्याच्या कामी उपयोगी पडेल असें करण्याची माहिती - या भागांत दिली आहे. रशिया, व ग्रेटब्रिटनमध्ये व आइसलंड बेटांत आणि अमेरिकेंत या जातीचे मेण पुष्कळ तयार होते; व तेथे याचे कारखाने बरेच आहेत. आपलेकडेही हल्ली ब्रम्हदेशांत हे मेण निघत असून त्याच्या बनलेल्या.. मेणबत्त्या बाजारांत पुष्कळ येतात. जेथे जेथें केरोसीन (घासलेट) तेलाचीउत्पत्ती आहे तेथे तेथें हे मेण निघण्याचा संभव आहे. हिंदुस्थानात ह तेल निघू लागले आहे, सबब जास्त तपास करून प्याराफीन मेण हाती लागण्याची तजवीज झाली पाहिजे. आता हे मेण शुद्ध करण्याचे काम