पान:मेणबत्त्या.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२५

इंचावर ११० पौंडांचा दाब पडेल इतके ते भांडे गच्च बंद असावे. मागें सांगितल्याप्रमाणे साबू शिजल्याची परीक्षा करावी. चुन्याचा साबू पूर्ण शिजल्यानंतर वाफेच्या दाबाने किंवा शोषक पंपाने ते सर्व मिश्रण क हौदांत नळीवाटें न्यावे, तेथें तें स्थिर ठेवावें.
 २री क्रिया-क हौदांत ते स्थिर झाल्यावर त्याच्या खालचे ग्लिसराईनयुक्त पाणी काढून दुसऱ्या पात्रांत ठेवावे.
 री क्रिया-तीव्र सलफ्युरीक आसीड २२ शेर घेऊन १०॥शेर पाण्यांत मिळवून ते मिश्रण चुन्याच्या साबूत मिळवावे. नंतर वारंवार ढवळून तीन तास शिजवावें.
 ४ थी व ५ वी क्रिया--पुढे स्निग्ध आसिडांच्या वड्या पाडून त्यांजवर थंडा व गरम दाब मागे लिहिलेल्या ४ थ्या व ६ व्या क्रियेप्रमाणे करून स्टिअरीक आसीड (स्टिअरीन ) तयार करावें.
 याप्रमाणे पहिल्या रीतीच्या तीन प्रकारांनी काम करून स्निग्ध पदार्थापासून घट्ट स्टिअरीक आसीड तयार करितात. पहिल्या प्रकारापेक्षा दुसन्याने व दुसऱ्यापेक्षा तिसऱ्या प्रकारानें काम करण्यांत खर्च कमी कमी होतो. पण हौद वगैरे भांड्यांची किंमत जास्त वाढत जाते हे लक्षात ठेवून या धंद्यास लागावें.
 या तीन्ही प्रकारांनी निघालेल्या पातळ ओलिईक आसिडांतही बरेंच स्टिरिक आसीड मिश्र असते. ह्मणून ते दाबाने निघालेले पातळ स्नग्ध आसीड (ओलिईक आसीड) लोकरीच्या कपड्यांतून किंवा गाळण्याच्या प्रेसमधून गाळून घ्यावें ह्मणजे कपड्यावर किंवा प्रेसवर स्टअरीक आसीड निराळे रहाते. अथवा ते पातळ आसीड कृतीने थंड इरावे ह्मणजे तळी घट्ट स्टिअरीक आसीड जमतें व वर पातळ ओलिकि आसीड पातळ स्थितीत जमते. नंतर तळचे स्टिअरीक आसीड