पान:मेणबत्त्या.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२४
तिसरा प्रकार.
 १ ल्या रीतीच्या तिसऱ्या प्रकारानें काम करण्याची माहिती - दुसऱ्या प्रकारांत मिश्रण शिजवितांना त्याजवर जास्त दाब केल्याने चुन्याचे प्रमाण दर शेकडा १६ , ४ भागावर आले हे तत्व समजले. पुढे याहीपेक्षा जास्त दाब देऊन शिजवितांना चुन्याचे प्रमाण कमी करण्याची युक्ति सांपडली. याच युक्तीप्रमाणे हल्ली इंग्लंड देशांत पुष्कळ कारखानदार स्टिअरीक आसीड तयार करितात.

 भांडी वगैरे सामान बहुतेक मागील प्रमाणेच असते. फक्त व हौदांत मिश्रणे घालण्यास व काढण्यास कॉकसहित नळ्या लागू करून तो जाड पत्र्यांचा मजबूत व त्याचें झांकण अधिक गच्च करण्यास त्यास जोरदार स्क्रू मारलेले असा तयार करावा. मिश्रण शिजतांना त्यावर जास्त दाब दिल्याने ते भांडे फुटण्याचा संभव असतो म्हणून वरील मजबुती करावी लागते. कोणी या कामी उभे पेपीन डिजेस्टर म्हणजे उभे लोखंडी पंचपात्र ( नळ्या कॉक व बंद झांकणासहित ) तयार मिळते त्याचा उपयोग करतात. भांडी वगैरे सामानांत एवढा फेरफार करावा लागतो. जास्त दाब म्हणजे जास्त उष्णता द्यावी लागते.
पहिल्या रीतीच्या तिसऱ्या प्रकारानें काम करण्याची माहिती.
 १ ली क्रिया-वरील कोणतेही मिश्रणाचा स्निग्ध पदार्थ १०० शेर ब हौदांत किंवा उभ्या पेपीन डिजेस्टर नामक पंचपात्रांत नळी वाट सोडावा. ताजा भाजलेला कळीचा चुना दोन शेर घेऊन ५० शेर गोड्या पाण्यात विरघळवावा. ते सर्व मिश्रण नळीवाटे सोडून ब हौदांतील किंवा पेपीन डिजेस्टरांतील स्निग्ध पदार्थात मिळवावे, नंतर वारंवार ढवळून ढवळून वाफेची किंवा विस्तवाची उष्णता देऊन चार तास ते मिश्रण शिजवावे. व ते मिश्रण शिजतांना त्याच्या दर चौरस