Jump to content

पान:मेणबत्त्या.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२६

काढून घ्यावे. स्टिअरीक आमीड व ओलिईक आसीड यांच्या किमती अनुक्रमें ३ व २ या प्रमाणाने बाजारांत असतात. ह्मणून फार खबरदारी घेऊन दोन्ही स्निग्ध आसिडें निरनिराळी करावीं मगजे नुकसान होण्याचा संभव नसतो.
 दुसऱ्या क्रियेने काढलेलें ग्लिसराईनयुक्त पाणी एका मोठ्या भांड्यांत सांठवून ठेवावे. त्यापासून स्वच्छ ग्लिसराईन तयार करण्याची माहिती -पुढे स्वतंत्र भागांत देण्यात येईल,
 याप्रमाणे वरील तीनही प्रकारांनी मेणबत्त्यांचे द्रव्य में स्टिआरक आसीड ते तयार करतांना जर चरबी व ताडाचे तेल हा मूळ स्निग्ध पदार्थ वापरला असेल तर त्याच्या १०० भागापासून पांढरें व कठिण स्टिअरीक आसीड ५०-५५ भाग तयार होते. पण वरच्या स्निग्ध पदार्थापेक्षा कमी उष्णमानावर पातळ होणारा मूळ स्निग्ध पदार्थ वापरला असेल तर स्टिअरीक आसीड शेकडा ५०-५५ भागांपेक्षा कमी तयार होते. या स्टिअरीक आसिडाचे पातळ होण्याचे उष्णमान १३२-१३५° फा. अंश असते.
 मेणबत्त्यांचे द्रव्य तयार करण्याची २रीरीत.
 २ री रीत-स्निग्ध पदार्थास अति उष्णता व अति दाब देऊन मेणबत्त्यांचे द्रव्य तयार करण्याची रीत.
 या रीतीने काम करण्याचे प्रकार तीन आहेत·
 च्युन्याच्या साबण क्रियेने मेणबत्त्यांचे द्रव्य तयार करण्याच्या शोधानंतर कोणत्याही आलकली किंवा आसिडाबरोबर स्निग्ध पदार्थ शिजविल्यावांचून त्या स्निग्ध पदार्थाचे घटक ( ग्लिसराईन व स्निग्ध आसिडे) निरनिराळे करण्याचा शोध सुरू झाला. त्या शोधाअंती असे समजले की अति उष्णतेखाली स्निग्ध पदार्थ नुसत्या अति उष्ण वाफ-