पान:मेणबत्त्या.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२३

हौदाचे झाकण स्क्रू मारून गच्च बंद केलेले असते व त्यांतून पातळ साबू शोषकपंपाने क हौदांत नेण्यास ब व क हौदास नळ जोडलेला असतो. इतकाच फेरफार करावा लागतो.
 १ ल्या रीतीच्या दुसऱ्या प्रकाराने काम करण्याची माहिती -याप्रकाराने काम करण्यांतही स्निग्ध पदार्थावर ५ क्रिया कराव्या लागतात.
 १ ली क्रिया-४ शेर ताजा चुना ४० शेर पाण्यात विरघळवून तें मिश्रण अ हौदांत ठेवावे. नंतर १०० शेर स्निग्ध पदार्थ ब हौदांत टाकावा. नंतर ते चुन्याचे पाणी सर्व चुन्यासह व हौदांतील स्निग्ध पदार्थात मिळवावें. शिजतांना या मिश्रणाच्या दर चौरस इंचावर ५६ पौंडांचा दाब पडेल, इतके त्या ब हौदांचें झांकण गच्च बंद करावें; व उष्णता द्यावी नंतर पहिल्या क्रियेप्रमाणेच ते मिश्रण वारंवार ढवळून वाफेने किंवा विस्तवाने चार तास शिजविले म्हणजे चुन्याचा साबू तयार होतो. तो शिजल्याची मागील प्रकारांत सांगितल्याप्रमाणे परीक्षा करून, पूर्ण शिजत्यानंतर उष्णता बंद करावी. नंतर तो सर्व पातळ साबू हवेच्या किंवा वाफेच्या दाबाने खालच्या नळीवाट उडवून क हौदांत आणावा व तेथे स्थीर ठेवावा.
 २ री क्रिया पातळ साबू स्थिर झाल्यावर खालचे ग्लिसराईनयुक्त पाणी निराळे काढून ठेवावें.
 ३री क्रिया ५- शेर सलफ्युरिक आसिड २१ शेर पाण्यांत मिळवून ते थंड झाल्यावर त्या साबूत मिळवावें. व तीन तास ढवळून शिजवावें.
 ४ थी व ५ वी क्रिया-पुढें स्निग्ध आसिडें निराळी काढून वड्या पाडून त्यांजवर थंडा व गरम दाब करण्याच्या किया (४ थी व ६ वी ) पहिल्या प्रकाराप्रमाणेच करून स्टिअरीक आसीड तयार करावें.