पान:मेणबत्त्या.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२२

अरिक आसिडांत दर शेकडा स्वच्छ केलेले मधमाशाचे मेण किंवा प्याराफीन २..१० भाग मिळवून त्याचे मोठाले गढे पाडण्यास तें. तशा साचांत ओतावें, तें कठीण झाल्यावर गढे काढून कोठारांत ठेवावे, यास. च व्यापारी लोक स्टिअरीन (स्टिअरीक आसीड ) ह्मणतात व त्याच्या मेणबत्या करितात, या पहिल्या प्रकाराने हल्ली फारच थोडे लोक हे काम करतात.
 दुसरा प्रकार--पहिल्या रीतीच्या दुसऱ्या प्रकारानें काम करण्याची माहिती या रीतीच्या पहिल्या प्रकाराने तयार केलेले स्टिअरीक आसीड कठीण असते तरी पण त्याचा रंग अगदी पांढरा स्वच्छ नसतो. याचे कारण त्या प्रकारांत चुना फार वापरल्यामुळे तो बाहेर काढून टाकण्यास में जास्त सलफ्युरीक आसीड वापरावे लागते. त्याच्या योगानें, तयार झालेल्या स्टिअरीक आसिडाचा रंग कमी पांढरा होतो व खर्च जास्त येतो. नवीन शोधांती असे समजले आहे की बंद भांड्यांत स्निग्ध पदार्थ ठेवून त्याच्या दर चौरस इंचावर ४२-५६ पौंड वजनाचा दाब देऊन जर चुन्याबरोबर तो पदार्थ शिजविला तर पूर्ण साबणक्रिया होण्यास त्याच्या दर १०० भागास चुना ३-४ भाग (शेकडा १६ भागांच्या ऐवजी) पुरे होतो. आणि तो चुना बाहेर काढण्यास, सलफ्युरिक आसिडही पहिल्या प्रकारापेक्षा कमी वापरावे लागते, त्यामुळे दुसच्या प्रका. राने तयार होणाऱ्या स्टिअरीक आसिडाचा रंग पहिल्या प्रकाराने तयार होणाऱ्या स्टिअरीक आसिडाच्या रंगापेक्षा अधिक पांढरा असतो. व खर्च कमी येतो. सबब या रीतीच्या दुसऱ्या प्रकाराचाच उपयोग हल्ला अमेरिकेंत या कामी विशेष करितात.
 या दुसऱ्या प्रकाराने काम करण्यास हौद भांडी वगैरे सामान पहिल्या प्रकारांतील सामानाप्रमाणे असते. पण आकृती नं. ३ मधील ब