पान:मेणबत्त्या.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२१

करून बरेच ढवळून स्थिर ठेवावे. वाफेने पातळ केल्यास त्यांत जें थोडेसे पाणी येते ते पाणी स्थिर ठेवले झणजे तळी जमते. नंतर वर आलेलें गरम ह्मणून पातळ स्टिअरिक आसीड त्या ड साचांत सोडावें. तेथें तें स्फटिकीभवन होईपर्यंत ह्मणजे घट्ट होईपर्यंत ठेवावें; व तोपर्यंत त्या खोलीचे उष्णमान ८६° फा. अंश ठेवावें. घट्ट झाल्यानंतर त्या वड्या साचांतून काढून सुरीने कापाव्या. ते कापलेले तुकडे एका टेब. लावर लागू केलेल्या फिरत्या सुरीवर धरून छिलावेत. ह्मणजे त्यांचे खरबरीत पीठ होते. ते पीठ घोड्याच्या केसाच्या किंवा लोकरीच्या पिशव्यांत भरून त्यांची तोंडे दुमटावी किंवा बंद करावी.
 नंतर इ या आडव्या हायड्रालिक प्रेसचे पत्रे १२०° फा. अंश गरम करून त्या पत्र्यांवर त्या भरलेल्या पिशव्या टेवाव्या. या हायडालिक प्रेसमध्ये दाबल्या जाणाऱ्या पदार्थास उष्णता देण्याचे साधन असते. नंतर प्रेस बंद करून दाब देण्यास सुरवात करावी. यावेळेस त्या अशुद्ध स्टिअरिक आसिडाचे उष्णमान, त्या प्रेसमध्ये लागू केलेल्या नळीतून वाफ सोडून १२०° फा. अंश ठेवावे. दाब वाढवीत वाढवीत पूर्ण द्यावा. त्या स्निग्ध. आसिडाच्या भुकटीस १२०° फा. अंशांची उष्णता व तिच्या दरेक चौरस इंचावर ६ टन वजनाचा दाब देण्यास सुरू केल्यानंतर तोच दाब व तीच उष्णता १५ मिनिटें कायम ठेवावी यास्तव तो प्रेस तशाच बंद स्थितींत १५ मिनिटें असू द्यावा. यायोगे त्या अशुद्ध आसिडांतील अशुद्ध ह्मणजे शेष राहिलेला पातळ व तेलकट पदार्थ बाहेर निघण्यास फारच सोईवार पडते. पंधरा मिनिटांनंतर तो प्रेस उघडावा. त्या पिशव्यांतील फार कठीण वड्या चाकूनें खरवडून बाहेर काढाव्या व त्या हौदांत टाकून गरमीने पातळ कराव्या. खरवडलेल्या चाकूवर व तळी राहिलेला भाग चांगला नसल्यास दुसऱ्या वेळेस चवथ्या क्रियेच्या आसिडांत मिळवावा. नंतर त्या पातळ झालेल्या स्टि-