पान:मेणबत्त्या.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना.




 सांप्रत आपले देशांत पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार बराच होत चालला आहे; तरीपण औद्योगीक शिक्षण मिळावे तसे मिळत नाही. यामुळे नवे धंदे सुरू होत नाहीत व जुने धंदे तर बहुतेक ठार बुडविले असून, राहिलेले कसे बुडतील याचा विचार चालू आहेच. यामळे या देशाची सांपत्तिक स्थिति अगदी निकृष्टावस्थेस आली आहे. युरोपीयन लोकांचे सान्निध्यामुळे बऱ्याच गोष्टींचे अनुकरण आपले लोक करूं लागले आहेत. त्यामुळे नव्या नव्या जिनसांची जरूरी उत्पन्न होऊन त्या त्या जिनसा ते लोक तयार करून आपणांस विकून पैसा कमावितात व स्वदेशाचे लोक मौजेखातर अशा पुष्कळ जिनसा खरीद करून पैसा गमावतात. याचा परिणाम देशाची सांपत्तिक स्थिति निकृष्टावस्थेत आली हा होय. आतां देश संपन्न असला झणजे धर्म, नीति, व्यापार, कलाशास्त्रे, व सदाचरण यांच्या वृद्धीकडे मनुष्याचे लक्ष सहज जातें.
 हल्ली या बाबतीत निरनिराळ्या देशहितचिंतकांकडून निरनिराळे प्रयत्न होत आहेत हे अभिनंदनीय आहे. उद्योगधंदे करावे अशी आस्था लोकांत हळुहळु वाढत चालली आहे, त्यामुळे हुन्नरकलांचे शास्त्रीय माहिती देणाऱ्या पुस्तकांची आवश्यकता उत्पन्न झाली आहे. यास्तव आम्ही मराठी भाषेत अशा विषयांची माहिती देणारी पुस्तकें प्रसिद्ध करण्याचे काम सुरु केले आहे त्या प्रमाणे प्रथम बटन व साबू व हल्ली हैं मेणबत्त्या तयार करण्याचे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. मेणबत्त्या तयार करण्याची मुळ द्रव्ये कोणती व त्याजवर कोणकोणत्या रसायनीक क्रिया