पान:मेणबत्त्या.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११४

असेल त्या स्निग्ध पदार्थाच्या जातीवर अवलंबून असते, उत्तम चरबी जर मूळ स्निग्ध पदार्थ असेल तर १२०° फा. अंशाची उष्णता । व दाबल्या जाणाऱ्या वडीच्या दर चौरस इंचावर ६ टन वजनाचा दा ६ व्या क्रियेत सांगितल्याप्रमाणे देवून दाबण्याचे काम करावे, अस अनुभविक रिवाज आहे.
 ज्या स्निग्ध पदार्थाचे पातळ होण्याचे उष्णमान जास्त असते त्यांतून ४ थ्या क्रियेने काढलेल्या घट्ट स्निग्ध आसिडांतील शेष राहिलेले पातळ स्निग्ध आसीड ६ व्या क्रियेप्रमाणे बाहेर काढण्यास जास्त दाब व जास्त उष्णता द्यावी लागते. व ज्या स्निग्ध पदार्थाचे पातळ होण्याचे उष्णमान त्यापेक्षा कमी कमी असते अशा घट्ट स्निग्ध आसिडामधून शेष पातळ आसीड ५ व्या क्रियेप्रमाणे बाहेर काढण्यात त्यापेक्षा कमी कमी दाब व कमी कमी उष्णता द्यावी लागते असा अनुभव आहे. ते पदार्थ अनुक्रमें चरबी, ताडाचे तेल हे आहेत. यापैकी चरबीच्या पातळ होण्याच्या उष्णमानापेक्षां इतर पुढील दर एक पदार्थाचे पातळ होण्याचे उष्णमान अनुक्रमें कमीकमी आहे. ह्मणून त्यांतील प्रत्येकाच्या घट्ट स्निग्ध आसिडांतील ५ व्या क्रियेनें शेष पातळ स्निग्ध आसीड बाहेर काढण्यास वर सांगितल्या (६ टन दाब व १२०° फा. अंश उष्णता) पेक्षा अनुक्रमें कमी कमी दाब व कमी कमी उष्णता देत जावी.
 चवथ्या क्रियेने तयार झालेल्या घट्ट स्निग्ध आसिडांत पातळ स्निग्ध आसिडाचा जो थोडा शेष भाग असतो तो त्यांतून बाहेर काढण्यास फारच अडचण पडते ह्मणून त्या घट्ट स्निग्ध आसिडावर ५ वी क्रिया करावी लागते. आणि ह्मणूनच चवथ्या क्रियेतील दाब व उष्णमानापेक्षां पांचव्या क्रियेत त्या घट्ट स्निग्ध आसिडावर जास्त दाब ( दर