पान:मेणबत्त्या.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११५

चौरस इंचावर ६ टन वजनाचा ) व जास्त उष्णता (१२०°फा. अंशांची ) देऊन त्यांतील पातळ आसिडाचा राहिलेला थोडा शेष भाग बाहेर काढून टाकावा लागतो.
 याप्रमाणे त्या प्रेसमधल्या पिशव्यांतील भुकटीवर ( दर चौरस इंचावर ६ टन वजनाचा पूर्ण दाब व १२०° फा. अंशाची पूर्ण उष्णता देऊन १५ मिनिटें कायम ठेवावी. यास्तव तो प्रेस तसाच बंद स्थितीत १५ मिनिटें बंद ठेवावा. नंतर तो प्रेस उघडून पिशव्यांतील वड्या चाकूनें खरवडून एका हौदांत टाकून गरमीनें पातळ कराव्या. या वेळेस त्या पातळ स्निग्ध आसिडांत स्वच्छ केलेले मधमाशांचे मेण शेकडा २-१० भाग मिसळतात. या योगे त्या घट्ट स्निग्ध आसिडाचा खरखरीतपणा कमी होतो. याच घट्ट स्निग्ध आसिडास व्यापारी लोक स्टिअरीन ( स्टिअरीक आसीड ) ह्मणतात. नंतर ते पातळ केलेले स्निग्ध आसीड साचांत ओतून त्याचे मोठाले गढे पाडून मेणबत्या करण्याकरिता ते गढे कोठारांत सांठवावे. याप्रमाणे स्निग्ध पदार्थावर चुन्याचे साबण क्रियेच्या रीतींत पांच क्रिया करून घट्ट स्निग्ध आसीड झणजे स्टिअ.. रीक आसीड तयार करितात.
 या रीतीने ५ क्रिया करून स्टिअरीक आसीड तयार करण्यास लागणारे हौद, कढया, प्रेस, साचे वगैरे व ते मांडण्याची व्यवस्था लक्षात येण्याकरिता त्याचे चित्र आकृती नंबर ३ मध्ये दिले आहे ते पहा.