पान:मेणबत्त्या.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११३

निघत नाही असे झाले ह्मणजे दाबण्याचे काम बंद करावे. यासच इंग्रेजीत केल्ड प्रसिंग ह्मणतात, या वेळेस त्या मित्र स्निग्ध आसिडांतील जे पातळ ओलिईक आसीड ते बहुतेक बाहेर निघाले असते व पिशव्यांत किंचित् ओ लिईक आसीड व बहुतेक स्टिअरीक आसीड राहिले असते त्या पिशव्यांतील वड्या पहिल्यापेक्षां पातळ बारीक व अधिक कठिण अशा असतात. अझूनही त्या घट्ट स्निग्ध वड्यांत पातळ ओलिईक आसीड थोडेसें तरी असतेच, ह्मणून ते पुढील ५ व्या क्रियेने काढावे लागते.
 ५ वी क्रिया-भिन्नीकरण अथवा गरम दाब करणें-चवथ्या क्रियेनंतर प्रेस उघडून त्या वड्या बाहेर काढून एका हौदांत टाकाव्या. तेथें वाफेने किंवा विस्तवाच्या गरमीने पातळ कराव्या. नंतर पनः वड्या पाडण्यास्तव ते पातळ झालेले द्रव्य साचांत टाकून खोलीत ते साचे ठेवावे. तेथे ते घट्ट होईपर्यंत ठेवावे. व तोपर्यंत त्या खोलीचे उष्णमान ८६° फा. अंश राहील अशी व्यवस्था करावी. घट्ट झा. ल्यावर त्या वड्या साचांतून काढाव्या आणि त्यांचे मोठाले तुकडे करावे. नंतर एका टेबलावर एक मोठी सुरी आडवी लागू करून ती फिरती ठेवावी त्या फिरत्या सुरीवर त्यांपैकी एकेक तुकडा धरून खरवडून काढावा. यायोगे त्या घट्ट स्निग्ध आसिडाची खरखरीत भुकटी होते. नंतर घोड्याच्या केसांच्या किंवा लोकरीच्या पिशव्यांत ती भुकटी भरून त्यांची तोडे दुमटावी किंवा बंद करावी. नंतर त्या पिशव्या हायप्रेसमध्ये ठेवाव्या. या प्रेसमध्ये दाबल्या जाणाऱ्या पदार्थास दाबतांना उष्णता देण्याचे साधन असते. त्या प्रेसचे पत्रे गरम करून नंतर त्या पिशव्या त्या पत्र्यावर ठेवाव्या. नंतर प्रेस बंद करून दाब देण्याचे काम सुरू करावे. यावेळेस किती दाब व किती उष्णता द्यावयाची त्याचे प्रमाण ज्या स्निग्ध पदार्थातून ते घट्ट स्निग्ध आसीड काढलें