पान:मेणबत्त्या.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११२

चुना निराळा झाला ह्मणजे शिजविणे बंद करावें. नंतर ते मिश्रण स्थिर ठेवावें मणजे तळी चुन्याचा सलफेट जमतो व मिश्र स्निग्ध आसिडांचा जाडसा थर वर येतो. ती मिश्र स्निग्ध आसिडें शोषक पंपाने हळूच काढून घेऊन तिसऱ्या हौदांत टाकावी. नंतर त्यांच्या दुपट पाणी त्यांत मिळवून वाफेने किंवा लाकडी कलथ्याने ते मिश्रण खूप ढवळावें ह्मणजे त्या हौदांत पाणी खाली व मिश्र स्निग्ध आसिडें वरती जमतात. याप्रमाणे स्निग्ध पदार्थातील स्निग्ध आसिडें निराळी काढली, पण यांत पातळ व घट्ट अशी दोनही जातीची स्निग्ध आसिडें मिश्र आहेत. मेणबत्या करण्यास घट्ट स्निग्ध आसीड पाहिजे. ते त्या मिश्र स्निग्ध आसिडांपासून पुढील दोन क्रियांनी निराळे करतात.
 ४ थी क्रिया भिन्नीकरण, अथवा थंडा दाब करणे-तिसऱ्या क्रियेने धुवून स्थिर झाल्यानंतर वरची स्निग्ध आसिडे काढून एका उघड्या कढईत टाकून गरमीने पातळ करावी. नंतर साचांत वड्या पाडण्याकरितां नळी वाटें ती सोडावीत. हे साचे, प्याराफिनच्या वड्या पाडण्याच्या साचांप्रमाणे बैठकासह असतात (पान ८३ पहा.) हे साचे टीनचे असून लोखंडी बैठकांवर एका खोलीत ठेवतात. याप्रमाणे तेथे त्या साचांत ती स्निग्ध आसिडें दोन तीन दिवस ठेवावी व तोपर्यंत त्या खोलीचे उष्णमान ६८ फा. अंश राहील अशी व्यवस्था करावी या योगाने ती स्फटिकीभवन पावतात झणजे बरीचशी घट्ट होतात. घट झाल्यानंतर क्यानवास कपड्याच्या किंवा लोकरीच्या चौकोनी पिशव्यांत त्यांच्या घट्टशा वड्या भराव्या. नंतर त्यांची तोंडे दुमटून त्या पिशव्याहात प्रेसमध्ये ठेवून दाबाव्या. प्रथम हळूहळू दाब करावा ह्मणजे त्यांतील पातळ ओलिईक आसीड बाहेर निघते. नंतर दाब हळूहळू वाढवावा. जोराचा दाब देऊनही त्या पिशव्यांतून पातळ पदार्थ बाहेर