पान:मेणबत्त्या.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१११

लवकर करितां येते व माल सुरेख उत्पन्न करितां येतो. ह्मणून त्या ६ क्रियांची माहिती खाली दिली आहे.
 १ली क्रिया-चुन्याची साबण क्रिया-कळीचुना ह्या आलकलीने स्निग्ध पदार्थाची साबणक्रिया करणे. स्निग्ध पदार्थाच्या दर १०० भागास ताजा कळीचुना ४-१६ भाग लागतो. तो त्याच्या दुप्पट किंवा अधिक गोड्या पाण्यात विरघळवून ते मिश्रण त्या स्निग्ध पदार्थात मिळवावे. नंतर वाफेने किंवा विस्तवाने तीन तास ते मिश्रण वारंवार ढवळून शिजवावें. पूर्ण शिजल्यावर उष्णता बंद करावी. या क्रियेत स्निग्ध पदार्थातील स्निग्ध आसिडें चुन्याबरोबर संयोग पावतात व ग्लिसराईन त्यांतून सुटे पडून तळच्या पाण्यांत मिश्र होऊन तळी जमतें व चुन्याचा साबू त्या पाण्यावर जमतो.
 २ री क्रिया ग्लिसराईन काढणें--पहिली क्रिया पुरी झाल्यानंतर चुन्याचा साबू थंड होऊ द्यावा. तो थंड झाल्यावर त्या खाली जमलेलें ग्लिसराईन युक्त पाणी खालच्यानळीने काढून दुसरीकडे ठेवावें.
 ३री क्रिया चुना निराळा करणे-नंतर त्या हौदांत राहिलेला चुन्याचा साबू खोदून काढावा. तो बारीक कुटून तशाच दुसऱ्या हौदांत टाकावा, कोणी ग्लिसराईन काढून घेतल्यावर ते मिश्रण पातळ करून हवेच्या किंवा वाफेच्या दाबाने दुसऱ्या हौदांत नळीवाट सोडतात. नंतर त्या साबूंत तीव्र सलफ्युरीक आसीड मिश्र करतात. पहिल्या क्रियेत जितका चुना मिळविला असेल त्याच्या तीन भागास तीव्र सलफ्युरकि आसीड ४ भाग मिळवावे लागते. तें सलफ्युरीक आसीड त्याच्या चौपट गोडे पाण्यांत मिळवावे व तें अम्लमिश्रण त्या कुटलेल्या किंवा पातळ चुन्याच्या साबूत मिळवावे. नंतर ते सर्व मिश्रण वारंवार ढवळून वाफेच्या किंवा विस्तवाच्या उष्णतेने तीन तास शिजवावें. सर्व