पान:मेणबत्त्या.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११०

 सामान्य दिग्दर्शन--एका हौदांत स्निग्ध पदार्थ घालावा त्यांत कळी चुना गोड्या पाण्यांत मिळवून मिश्र करावा. नंतर ते सर्व मिश्रण वाफेने किंवा विस्तवाने गरम करून ४ तास उकळावे. म्हणजे चुन्याचा अविद्राव्य साबू तयार होतो, व ग्लिसराईन सुटे पडून खालच्या पाण्यांत जमते. तें ग्लिसराईनयुक्त पाणी प्रथम खालच्या नळीने काढून घेऊन निराळे ठेवावे. नंतर वरचा दगडासारखा कठिण साबू काढून तसाच दसऱ्या हौदांत टाकावा. त्या साबंत सलफ्यरिक आसीड मिळवून ते मिश्रण पुनः तीन तास शिजवावें. म्हणजे त्या साबूतील चुन्याचा संयोग सलफ्युरीक आसिडाबरोबर होऊन तो चुन्याचा सलफेट तयार होतो तो तळी बसतो व स्निग्ध आसिडें त्या मिश्रणाच्या वर जमतात. नंतर ती मिश्र ( पातळ व घट्ट ) स्निग्ध आसि. तिसऱ्या हौदांत काढून तेथें ऊन पाणी व वाफ यांनी धुवून स्थिर ठेवावी. ठरल्यावर वरची स्निग्ध आसिडें हळूच काढून टिनच्या साचांत ओतून दोन तीन दिवस ६७° फा. अंश उष्णमानावर ठेवावी. झणजे ती बरीचशी घट्ट होतात. नंतर पिशव्यांत घालून हायडालीक प्रेसमध्ये दाबून काढावी. ह्मणजे पातळ स्निग्ध आसीड बाहेर निघतें व घट्ट स्निग्ध आसिडाचा गोळा पिशव्यांत रहातो. त्या घट्ट स्निग्ध आसीडास पुनः एकवार जास्त उष्णमानावर दाबून पांढरे व घट्ट स्निग्ध आसीड तयार करतात. त्याचे मोठाले गठे ओतून कोठारांत साठवितात. याच पांढऱ्या व घट्ट स्निग्ध आसिडास स्टिअरीक आसीड किंवा व्यापारी भाषेनें स्टिअरीन ह्मणतात. त्याच्याच मेणबत्त्या तयार करतात.
 सर्व पद्धतवार माहिती-या रीतीने काम करण्यामध्ये चांगली वाकबगारी होण्यास्तव स्निग्ध पदार्थावर ज्या निरनिराळ्या ५ क्रिया कराव्या लागतात त्या बरोबर समजल्या पाहिजेत. ह्मणजे काम