पान:मेणबत्त्या.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१ लीरीत-चुन्याच्या ( Lime Saponification ) योगाने स्निग्ध पदार्थाची साबण क्रिया घडवून घट्ट स्निग्ध आसीड तयार करणे. २री रीत-स्निग्ध पदार्थास अति उष्णता व अति. दाब देऊन त्यांतील मिश्र स्निग्ध आसिडें व ग्लिसराईन निराळी करणे व नंतर त्या मिश्र स्निग्ध आसिडापासून दाबाने घट्ट स्निग्ध आसीड तयार करणे, ३री रीत-सलफ्युरीक आसिडाने स्निग्ध पदार्थावर अम्लक्रिया (आसिडीफिकेशन Acidification ) घडवून, घट्ट स्निग्ध आसीड तयार करणे. या रीतीत दाब व उष्णता जास्त द्यावी लागतात; व उर्ध्वपातन करावे लागते. ४ थी रीत–वरील रीतींपैकी दोन किंवा तीनही रीतींनी मिळून स्निग्ध पदार्थापासून घट्ट स्निग्ध आसीड तयार करणे. १वी रीत- प्राणिज व वनस्पतिज पातळ तेलांवर सलफ्युरीक किंवा सलफ्युरस आसिडांची क्रिया घडवून त्यांचे घट्ट स्निग्ध आसीड तयार करणे. या रीतींत दाब व उष्णता कमी लागतात व स्निग्ध पदार्थ पातळ झणजे घट्ट स्निग्ध आसीड अगदी कमी असणारा असला तरी उपयोगी पडतो. ६ वीरीत- पातळ स्निग्ध आसिडें व पातळ वनस्पतिज तेले यांजवर तीव्र सोड्याची क्रिया घडवून त्यांपासून घट्ट स्निग्ध आसीड तयार करणे. जरी प्रत्येक वनस्पतिज तेलांत थोडेसें तरी घट्ट स्निग्ध आसीड असते, तरी पण हा धंदा फायदेशीर रीतीने चालण्यास ज्या स्निग्ध पदार्थात घट्ट स्निग्ध आसीड जास्त प्रमाणानें असतें तोच स्निग्ध पदार्थ या कामी वापरतात. जर कमी प्रमाणाने घट्ट स्निग्ध आसीड असणारा स्निग्ध पदार्थ वापरला तर खर्च जास्त येतो व नफा कमी रहतो किंवा