पान:मेणबत्त्या.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०७

नुकसान होण्याचा संभव असतो. ह्मणून ज्या स्निग्ध पदार्थात घट्ट स्निग्ध आसीड जास्त असते, ते स्निग्ध पदार्थ, पहिल्या चार रीतींनी मेणबत्यांचे घट्ट स्निग्ध आसीड तयार करण्याच्या कामी वापरावे. ते पदार्थ १ चरबी, २ ताडाचें तेल,३ कोकंबेल, ४ तूप,५ मोहाच्या बियांचे तेल व ६ खोबरेल, इतके आहेत. त्यांतही तूप फारच महाग असल्याने, अति धर्मश्रद्धेशिवाय जाळण्याच्या कामी त्याचा उपयोग फारसे कोणी करणार नाहीत. खोबरेल तेलापासून निघणारें घट्ट स्निग्ध आसीड प्रमाणाने कमी निघतें व त्याचे पातळ होण्याचे उष्णमानही फार कमी असते, ह्मणून चांगल्या मेणबत्या करण्याच्या कामी त्याचा उपयोग फारसा करीत नाहीत.
 प्राणिज व वनस्पतिज तेलें यांत घट्ट स्निग्ध आसिडाचे प्रमाण फार कमी असते, ह्मणून वरील प्रथमच्या चार रीतीत त्यांचा उपयोग करीत नाहीत; व त्या प्रथमच्या चार रीतींनी घट्ट स्निग्ध आसीड काढतांना त्यापासून जे पातळ ओलिईकं आसीड बरेंच उत्पन्न होते, त्याचाही साबूशिवाय फारसा उपयोग होत नाही. ह्मणून शोधक, बुद्धिवान् व उद्योगी पुरुषांनी, या तीनही हलक्या प्रतीच्या द्रव्यांपासून मेणबत्या करण्याचे घट्ट स्निग्ध आसीड तयार करण्याचा शोध लाविला आहे. त्याप्रमाणे त्यांचा उपयोग ५ व्या व ६ व्या रीतीनी मेणबत्यांचे घट्ट स्निग्ध आसीड तयार करण्याच्या कामी करतात. त्यांची याद त्या रीतीच्या वर्णनांत येईल.
 वर लिहिलेल्या ६ रीतींपैकी प्रथमच्या ४ रीतींनी घट्ट स्निग्ध आसीड तयार करण्यास एकच स्निग्ध पदार्थ घेत नाहीत. पण एक दोन किंवा अधिक स्निग्ध पदार्थ एकत्र करून त्या स्निग्ध पदार्थांच्या एकेक मिश्रणापासून दरेक रीतीने घट्ट स्निग्ध आसीड तयार करतात. स्निग्ध पदार्थांची ती मिश्रणे खाली लिहिली आहेत.