पान:मेणबत्त्या.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०५
भाग ५ वा.



स्निग्ध पदार्थापासून मेणबत्त्या होणारी घट्ट स्निग्ध आसिडें तयार करणे.

 या पुस्तकाच्या दुसऱ्या भागांत कांहीं घट्ट स्निग्ध पदार्थ नुसते दाबूनच त्यापासून स्टिअरीन काढतात असे सांगितले आहे. पण तें स्टिअरीन म्हणजे घट्ट स्निग्घ आसीड नव्हे, हे लक्षात ठेवावे. ते नुसतें दाबून काढलेले स्टिअरीन व ज्यास व्यापारी लोक पारिभाषीक रीतीने स्टिअरीन (खरे स्टिअरीक आसीड) म्हणतात त्या दोहोंमध्ये रसायन रीतीने व जळण्याच्या मानाने फारच अंतर आहे. दुसऱ्या भागांत सांगितलेल्या नुसत्या दाबाच्या रीतीने हल्लीच्या काळी स्टिअरीन क्वचितच तयार करतात.
 आतां दुसऱ्या भागांत सांगितलेल्या मेणबत्या होणाऱ्या द्रव्यांपैकी १७ द्रव्यांपासून मेणबत्यांचे द्रव्य तयार करण्याची माहिती या पुस्तकाच्या तिसऱ्या व चौथ्या भागांत दिली आहे. दुसऱ्या भागांत सांगितलेल्या मूळ द्रव्यांपैकी, ६ द्रव्ये व कांही त्यांपैकींची द्रव्ये आणि बाकीची वनस्पतिज तेले व पातळ स्निग्ध आसिडें यांपासून मेणबत्या करण्याचे घट्ट स्निग्ध आसीड उत्तम व शास्त्रीय पद्धतीने तयार करण्याची माहिती या भागांत देणे आहे.
 या कामी वापरल्या जाणाऱ्या द्रव्यांत मुख्यत्वेकरून चरबी,ताडाचे तेल, कोकंबल,तूप, खोबऱ्याचें तेल, मोहाच्या बियाचे तेल व इतर सर्व वनस्पतिज तेले व पातळ स्निग्ध आसिडे यांचा उपयोग करावा.
 वर लिहिलेल्या सर्व पदार्थापासून मेणबत्या करण्याचे घट्ट स्निग्ध आसीड तयार करण्याच्या ६ रीती हल्ली प्रचारांत आहेत. त्या खाली लिहिल्याप्रमाणे.